Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील कोटमगावसह जिल्ह्यातील ६ देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त

April 18, 2022
in सरकारी बातम्या
0
Kotam Gaon temple

मुक्तपीठ टीम

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगाव प्रसिद्ध श्री.जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर,देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री.रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री. क्षेत्र श्रीराम मंदिरास ब वर्ग प्राप्त झाला आहे. या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने या तीर्थक्षेत्राच्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून लवकरच अधिक निधी प्राप्त होऊन या देवस्थानच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.

 

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री. जगदंबा देवस्थान अतिशय प्रसिद्ध असून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील श्री.जगदंबा देवस्थानचा विकास करण्यात आला आहे. या मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छता गृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभिकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविक या ठिकाणी अधिक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यासाठी या देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त व्हावा याकरिता मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता.

 

येवला तालुक्यातील या प्रसिद्ध देवस्थानाला ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने पर्यटन तसेच यात्रास्थळ विकास योजने अंतर्गत याठिकाणी अधिक सुविधा प्राप्त करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. परिणामी याठिकाणी भाविक अधिक मोठ्या संख्येने येऊन पर्यटनात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील अर्थकारणाला देखील अधिक गती प्राप्त होणार आहे.

 

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील या देवस्थानांना देखील ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त

यामध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री.रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान , तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री. क्षेत्र श्रीराम मंदिर यांना देखील ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.


Tags: chhagan bhujbalyeolaकोटमगावछगन भुजबळनाशिकयेवलाश्री. जगदंबा देवस्थान
Previous Post

धर्मांध हरणार, महाराष्ट्र जिंकणार!

Next Post

शरद पवारांवर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप करत भाजपाची कारवाईची मागणी!

Next Post
Atul Bhatkhalkar

शरद पवारांवर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप करत भाजपाची कारवाईची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!