Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ६ कोटी निधीस मान्यता”: अशोक चव्हाण

August 6, 2021
in सरकारी बातम्या
0
Ashok chavan

मुक्तपीठ टीम

कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली –कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणी करण्यासाठी तातडीने ६ कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. हा पुल कोसळ्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.

 

२१-२२ जुलै २०२१ च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात अनेक रस्ते बंद झाले होते. त्यातच कनेडी (सांगवे) -कणकवली दरम्यानच्या नाटळ मल्हारी नदीवरील सुमारे ५७ वर्षापूर्वी बांधलेला मल्हार पुलाचा काही भाग कोसळला होता. यामुळे नाटळ, दिगवळे, नरवडे यासह दहा गावांचा संपर्क तुटला. या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री. चव्हाण यांनी विभागास दिले होते. त्यानुसार, विभागाने सहा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंत्री महोदयांकडे पाठविला होता.

 

कनेडी परिसरातील गावांचा कणकवलीशी संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून लगेचच मंजूर केला. यामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे)- कुपवडे-कडावलनारुर-वाडोस-शिवापूर-शिरसिंगे-कलंबिस्त-वेर्ले-सांगेली-धवडकी-दाणोली-बांदा रस्त्यावरील गावांचा संपर्क पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.


Tags: Ashok ChavanCongressअशोक चव्हाणकणकवलीडी.पी. सावंतमल्हारी नदीसिंधुदुर्ग
Previous Post

“गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे”

Next Post

राज्यात ५ हजार ५३९ नवीन रुग्णांचे निदान, ५ हजार ८५९ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ५ हजार ५३९ नवीन रुग्णांचे निदान, ५ हजार ८५९ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!