Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यासाठी ८५.२७ कोटींच्या वाढीव निधीसह एकूण ५०० कोटींचा निधी! – अजित पवार

January 21, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Rs.500 crore sanctioned for district

मुक्तपीठ टीम

नाशिक जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी जिल्ह्याला ४१४.७३ कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या ८५.२७ कोटी रुपयांच्या वाढीव मागणीमुळे सर्वसाधारण योजनेसाठी ५०० कोटी रुपयांचा अंतिम नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे राज्याच्या उत्पादनात घट झालेली असताना देखील जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न केला आहे असे उपमुख्यमंत्री यांनी प्रतिपादन केले.

 

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जिल्ह्याच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुलभाग लक्षात घेता, अनुसूचित जाती १०० कोटी व अनुसूचित जमातींच्या विकासासाठी २९० कोटी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा या भागातील मूलभूत सुविधा निर्मितीसाठी वापर करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच तालुकास्तरावर महसूल विभागासाठी वाहने घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजन करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्या आहेत.

सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास होणार : छगन भुजबळ

जिल्ह्यात रस्ते, वीज वितरण, जलसंधारण, ऊर्जा व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने असणाऱ्या कामांसाठी जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे २५ टक्के म्हणजेच १७०.०० कोटी वाढीव निधीची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय बैठकीत केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सद्यस्थितीत शासनाकडील निधी उपलब्धतेवरील मर्यादा पाहता मागील वर्ष २०२१-२२ च्या ४७० कोटी मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षाकरीता ५०० कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले जिल्ह्याचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यातील जे प्रश्न अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाला कार्यालये, वाहने घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

 

बैठकीच्या सुरूवातीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागील दोन वर्षांत कोविड उपाययोजनांसाठी विभागात ४८७ कोटी प्राप्त निधीपैकी ३२३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच पोलिस विभागास १०७ चारचाकी व ९९ दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे विभागीय आुयक्त कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहासाठी अतिरिक्त निधीची केलेली मागणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मान्य केली.

 

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, २०२१-२२ मध्ये सर्वसाधारण योजनेतंर्गत १६ जानेवारी २०२२ पर्यंत १४१.३१ कोटी निधी खर्च झाला आहे. त्याची एकूण नियतव्ययाशी टक्केवारी ३०% असून वितरीत तरतूदीशी खर्चाची टक्केवारी ९२.९१ इतकी आहे. नाशिक जिल्ह्याचा विभागात २ रा क्रमांक असून मागील वर्षी याच दरम्यान झालेल्या खर्चाच्या तुलनेत दुप्पट खर्च सध्या झालेला असल्याने वर्षा अखेरपर्यंत निधी खर्च होईल असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. तसेच मागील तीन वर्षाच्या नियतव्ययाशी तुलना करता या वर्षी जिल्ह्याला त्या प्रमाणात वाढीव निधी मिळणे आवश्यक असल्याची कारणमीमांसा देखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बैठकीत सादरीकरण करतेवेळी केली.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपस्थित जिल्ह्यातीलआमदार यांनी आपापल्या भागातील प्रश्न उपस्थित करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली.


Previous Post

पटोले यांच्या अटकेऐवजी भाजपाने अजय मिश्रा यांचा राजीनामा मागावा

Next Post

खासदार अमोल कोल्हेंचा नथुरामावतार! राष्ट्रवादीच्याच चार नेत्यांच्या चार भूमिका! काँग्रेसची टीका तर भाजपाकडून समर्थन!

Next Post
nathuram Godse

खासदार अमोल कोल्हेंचा नथुरामावतार! राष्ट्रवादीच्याच चार नेत्यांच्या चार भूमिका! काँग्रेसची टीका तर भाजपाकडून समर्थन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!