मुक्तपीठ टीम
देशात सर्वत्र कोरोना पसरलेला असतानाही मास्क वापरणाऱ्याची संख्या कमी आहे. लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळेच मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने एकूण २१,४२० लोकांना दंड ठोठावला आहे. तर जवळजवळ ४२ लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे. मार्च २०२० पासून या तिन्ही एजन्सींनी सुमारे २२ लाख लोकांना दंड दिला असून ४४.५ कोटींचा दंड वसूल केला आहे.
२० मार्च २०२१ रोजी महानगरपालिकेने १४,१४२ लोकांना दंड दिला असून, २८ लाख रुपये वसूल करण्यात आले. तर मुंबई पोलिसांनी ६,७८९ लोकांना दंड ठोठावला असून जवळजवळ १३.५ लाख रूपये वसूल करण्यात आले आहेत. रेल्वेने ४८९ लोकांना दंड दिला आणि ९७,००० रुपये दंड वसूल केला.
शहरातील कोरोना प्रकरणात वाढ झाल्याने आणि अनेकांच्या निष्काळजीपणाच्या वर्तवणुकीमुळे, मनपाने पुन्हा एकदा मानदंडांचे उल्लंघन करणार्यांना दंड ठोठावण्याची मोहीम आणखी तीव्र केली आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार, तिन्ही एजन्सीज जवळजवळ २०,००० लोकांना दंड ठोठावत आहेत आणि दररोज सरासरी ४० लाखाहून अधिक दंड वसूल करतात.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेल्या महिन्यात महापालिकेच्या क्लीन-अप मार्शल्सच्या मारामारीच्या बातम्या समोर आल्यावर गैरवर्तन करण्यास सांगितले नव्हते. “आमचा उद्देश पैसा कमविणे हा नाही. ते जनजागृती करणे आहे, ” असे पेडणेकर यांनी मार्शल्सना सांगितले होते.