Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चास मान्यता

March 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bala saheb thackeray

मुक्तपीठ टीम 

मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात वाढ, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय आणि पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाचे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत:

मंत्रिमंडळ निर्णय -१

महिला व बालविकास विभाग

बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करणार

बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात ४२५ वरून ११०० रुपये इतकी तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदानात प्रती बालक ७५ वरून १२५ इतकी वाढ करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे प्रति बालकास देण्यात येणारे अनुदान १ हजार २२५ रुपये इतके होईल.

या बालकांना लाभ

बालसंगोपन योजने अंतर्गत अनाथ, ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके, एक पालक असलेली व संकटग्रस्त कुटुंबातील बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणामुळे विघटीत झालेली बालके, एकपालक कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही ग्रस्त/बाधीत बालके, तीव्र मतीमंद, एकाधिक अपंगत्व असलेली बालके, दोन्ही पालक अपंग आहेत, न्यायालीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले बालकामगार, बाल न्याय अधिनियमातील तरतूदीमधील मुलांच्या व्याख्येनुसार वयाची १८ वर्षे पुर्ण केलेली नाहीत ती मुले अशी बालके यांचा समावेश होतो.

राज्यामध्ये १३४ स्वंयसेवी संस्था व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली योग्य कुटुंब प्रमुखामार्फत १७ हजार बालकांचे संगोपन केले जाते. या योजनेतून मुलांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा संबंधित कुटूंबामार्फत पुरविण्यात येतात.

—–०—–

 

मंत्रिमंडळ निर्णय – २

वैद्यकीय शिक्षण विभाग

नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय होणार

 

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 50 असणार असून यासाठी आवश्यक पदनिर्मितीस आणि खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी 16 कोटी 9 लाख 14 हजार 480 च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नांदेड शहर शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या मराठवाड्यातील एक प्रमुख केंद्र म्हणून विकसीत होत असल्याने जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या भागातील बरेचसे लोक शहरास भेट देतात. तसेच नांदेड शहरात शीख धर्माचे पवित्र स्थान असल्यामुळे तेथे दरवर्षी भाविक तसेच पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. परिणामी, येथील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असे परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

—–०—–

मंत्रिमंडळ निर्णय – ३

पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील

शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

पदुम विभाग

महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षण व शिक्षक समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या निर्णयामुळे विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयातील शिक्षकांसोबत विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय पशु चिकित्सा परिषद, भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि राज्य शासन यांनी शिक्षक समकक्ष म्हणून घोषित केलेल्या पदांना लाभ होणार आहे. वेतनाचे स्तर, सुरुवातीचे वेतन आणि कुलगुरु यांचे वेतन निश्चित करण्यात येईल.

या पदांना सुधारीत वेतन संरचना आणि महागाई भत्ता व इतर भत्ते 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ 388 शिक्षक व शिक्षक समकक्ष पदांवर कार्यरत व्यक्तींना होणार आहे. याकरिता 17.94 कोटी रुपये एवढा निधी थकीत रकमेसाठी तसेच 12 कोटी एवढा निधी वार्षिक खर्चासाठी देण्यात येईल.

—–०—–

 

मंत्रिमंडळ निर्णय – ४

नगर विकास विभाग

मुंबईतील महापौर निवास परिसरात

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीस सुधारित मान्यता

 

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टण्पा- १ व २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलितयंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाहय सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.

टप्पा-१ करिता अंदाजित किंमत २५० कोटी रुपये (करांसहित) इतकी आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो. डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हच्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. टप्पा २ करिता १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ व टप्पा २ निहाय कामाची एकूण रु. ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. यानुषंगाने सदर प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४०० कोटी रक्कमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.


Tags: Balasaheb thackeray memorialcm uddhav thackeraymaharashtra cabinet decisionनगर विकास विभागबाळासाहेब ठाकरेमहाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णयमहिला व बालविकास विभाग
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! मराठीची उपेक्षा, राजकीय अनास्था चिंताजनक

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलचा काही दिवसांपूर्वी अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबतच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. 2) प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. 3) बाहुबली चित्रपटामधला भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 4) आपली भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणारे कलाकार नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ते एका नव्या चित्रपटात काम करत आहेत. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानी ही माहिती दिली आहे. 5) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम आदेश बांदेकर अभिनेता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होणार आहे.

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलचा काही दिवसांपूर्वी अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबतच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. 2) प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. 3) बाहुबली चित्रपटामधला भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 4) आपली भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणारे कलाकार नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ते एका नव्या चित्रपटात काम करत आहेत. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानी ही माहिती दिली आहे. 5) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम आदेश बांदेकर अभिनेता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होणार आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!