Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्रात २४ तासात ३९ किमी रस्ता, ‘राजपथ’ विश्वविक्रम

June 1, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
maharashtra

मुक्तपीठ टीम

हे वर्ष महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं एकसष्टीचं. राज्याच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक अनोखे अभिवादन करण्यात आलं. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेनुसार राजपथ इन्फ्राकॉनने ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. हा रस्ता साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान आहे. एका दिवसात ३० किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना ‘राजपथ’ टीमने तब्बल ३९.६९ किमीचा रस्ता तयार करत विक्रम स्थापित केला. त्यामुळे राजपथचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. ३९.६९ किलोमीटरचा हा रस्ता रविवारी ३० मे रोजी सकाळी सात ते सोमवारी ३१ मे रोजी सकाळी ७ या वेळेत म्हणजेच २४ तासात तयार करण्यात आला. साडेतीन मीटर रुंद आणि ३९.६९ किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, गोपूज, म्हासूर्णे असा होता. जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. सरकारच्या कोरोना नियमावलीचे पालन करून हा उपक्रम झाला. राजपथ टीमचं मुक्तपीठ टीमकडून अभिनंदन आणि भविष्यातील विक्रमांसाठी शुभेच्छा.

maharashtra

असा झाला विक्रम

• या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले.
• ३९.६९ किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले.
• प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते. या कामासाठी एकूण १५,००० मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते.
• काँक्रीटचे हे मटेरिअल पसरविण्यासाठी आठ पेव्हर, १६ टँडम रोलर व आठ पीटीआर वापरण्यात आले.
• या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण २१० हायवा टिपर वापरण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते.
• एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते.
• यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

जगदीश कदम म्हणाले, “पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला सातारा जिल्हयातील पुसेगाव ते म्हासुर्णे ह्या ४७ किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते. यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी, तसेच या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना आली. राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ३९.६९ किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला. हा विश्वविक्रम राज्यातील जनतेला समर्पित करतो.”

 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण व सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्दर्शन व सहकार्य लाभले. साताराचे जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, व शासनाच्या सर्व विभागांनी चांगले सहकार्य केले. राजपथ इन्फ्राकॉनमधील माझ्या सर्व सेवक सहकार्यांनी हा विश्वविक्रम संकल्प तडीस नेण्यासाठी अहोरात्र झटून मनापासून प्रयत्न केले. हा विश्वविक्रम करतांना या सर्व मंडळीचे मन:पूर्वक योगदान राहिले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच राजपथ कंपनी हा विश्वविक्रम पुर्णत्वास नेऊ शकली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो,” असे जगदीश कदम यांनी नमूद केले.

maharashtra

उल्हास देबडवार म्हणाले, “कोरोनामुळे कामाला अडथळा येत होता. पण या कठीण काळात अशी अनोखी कल्पना जगदीश कदम व राजपथने मांडली. अशा नकारात्मक वातावरणात हा संकल्प पूर्ण करून प्रेरणा देण्याचे काम राजपथने केले आहे. राज्यात पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध असून, अशा कार्यक्षम कंत्राटदारांनी दर्जेदार कामे कमी वेळेत केली तर राज्यातील जनतेला चांगले रस्ते मिळतील. या रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा नियमित स्वरूपात तपासला जात आहे. जगदीश कदम यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदा साळुंके, मुंगळीवार, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

Maharashtra

राजपथ इन्फ्राकॉन यशस्वी वाटचाल

• राजपथ कंपनीची स्थापना ३२ वर्षापूर्वी झाली.
• सुरूवातीपासून कंपनीने पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांमध्ये स्वत:चा ठसा उमटविण्याला. राष्ट्रनिर्मितीच्या कामात कंपनीचा असलेला सहभाग खारीचा वाटा असल्यासारखा आहे.
• परंतू या गोष्टीचा राजपथ इन्फ्राकॉन कंपनीतील प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. आजपर्यंत राजपथ कंपनीने अनेक प्रशंसनीय व गौरवाला पात्र असलेली कामे पायाभूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात केली आहे.
• पुणे जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधा-याचे धरणाचे काम पाच महिन्यात केले.
• जागतिक बँक व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा उजवा कालव्याच्या १४८ किलोमीटरचे काम वेळेत व उत्तम गुणवत्तेसह पुर्ण केल्यामुळे जागतिक बँकेने कौतुक केले.
• राज्यातील खारपाण पट्‌टयातील अमरावती जिल्ह्यात पहिल्या क्रॉकीट बॅरेजचे काम पुर्ण केले.
• तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतीभवन येथे सन्मान केला.
• राजपथने नागपूर-हैद्राबाद ह्या राष्ट्रीय महार्गावरील १० वर्ष प्रलंबित असलेल्या व दोनदा टर्मिनेट झालेल्या चार पदरी रस्त्याचे काम विक्रमी दोन वर्षात पुर्ण केले. त्यानिमित्त एनएचएआयने सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देऊन गौरवले आहे. राजपथ कंपनीने गेल्या साडेतीन दशकात चांगले काम करत महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक, एनएचएआय, एअरपोर्ट ऑथॉरिटी आदीकडून अनेक सन्मान प्राप्त केले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: chief minister uddhav thackerayDeputy Chief Minister Ajit Pawarउपमुख्यमंत्री अजित पवारजगदीश कदममुख्यमंत्री उद्वव ठाकरेराजपथ इन्फ्राकॉन
Previous Post

भटक्या प्राण्यांना भुकेलं राहू न देण्यासाठी तरुणाईचे ‘पॉ पेट्रोलिंग’

Next Post

पर्यावरण आणि पृथ्वीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींचा म्युझिक व्हिडीओ

Next Post
Bollywood

पर्यावरण आणि पृथ्वीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींचा म्युझिक व्हिडीओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!