मुक्तपीठ टीम
नाशिक महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती आहे. तेथे एकूण ३४६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२, २३, २६ आणि २७ जुलैपर्यंत दुपारी ३ ते ५ या वेळेत थेट मुलाखत देऊ शकतात.
पदं आणि रिक्त जागांची माहिती
• वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदासाठी ४० जागा
• हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी १२ जागा
• स्टाफ नर्स या पदासाठी ५० जागा
• भिषक या पदासाठी २८ जागा
• भुलतज्ज्ञ या पदासाठी ६ जागा
• एएनएम या पदासाठी २०० जागा
• एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी ३ जागा
• इसीजी टेक्निशियन या पदासाठी ७ जागा
अशा एकूण ३४६ जागांसाठी भरती आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमडी मेडिसिन चेस्ट/ डीएनबी/ एफसीपीएस
२) पद क्र.२- एमडी/ डीए
३) पद क्र.३- एमबीबीएस
४) पद क्र.४- एमबीए (हेल्थ केयर/ हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन)/ एमपीएच/ एमएचए
५) पद क्र.५- बी.एससी (नर्सिंग) किंवा जीएनएम
६) पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम
७) पद क्र.७- १) बी.एससी २) इसीजी अॅन्ड एक्स-रे टेक्निशियन कोर्स
८) पद क्र.८- १) बी.एससी २) इसीजी कोर्स असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://nmc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.