Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आता न्हावा शेवा बंदरात ड्रग्स! तेलाच्या पिंपात लपवलेले २५ किलो हेरॉईन जप्त!

इराणच्या चाबहार बंदरातून हा कंटेनर अफगाणिस्तानातून आयात करण्यात आला होता

October 10, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
न्हावा शेवा बंदर

मुक्तपीठ टीम

मुंद्रा बंदरात सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्सचा विषय ताजा असतानाच आता रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा बंदरात २५ किलो हेरॉइन सापडले आहे. अफगानिस्तानातून इराणच्या चाबहार बंदरातून हा कंटेनर आयात करण्यात आला होता. त्यातील तेलाच्या पिंपात हे हेरॉइन लपवले होते. मुंद्रा बंदरात सापडलेल्या ड्रग्सच्या कंसाइनमेंटप्रमाणेच हेही त्याच रुटने आले आहे.

 

कंटेनर क्रमांक पीएआरयू२२५२२६० द्वारे आयात केलेल्या मालामध्ये एनडीपीएस अधिनियम, १९८५ अंतर्गत प्रतिबंधीत असणाऱ्या वस्तू समाविष्ट असण्याची शक्यता वर्तवणारी विशेष गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या मुंबई विभागीय युनिटला प्राप्त झाली होती. मुंबईच्या मस्जिद बंदरचा पत्ता असलेल्या आयातदाराच्या नावाने कंधारमधून कंटेनर आयात करण्यात आला होता. हा कंटेनर इराणमधील चाबहार बंदरातून आला होता.

 

तेलाच्या तळाशी हेरॉइन!

न्हावा शेवा बंदरातील ईएफसी लॉजिस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा कंटेनर मालवाहतूक स्थानक येथे होता आणि ५ आँक्टोबर २०२१ रोजी महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या कंटेनरची तपासणी केली. सीमाशुल्क संबंधित कागदपत्रात कंटेनरमध्ये तीळ तेल आणि मोहरीचे तेल म्हणून माल असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र सखोल तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, मोहरीच्या तेलाच्या ५ कॅनमधील सामग्री वेगळी आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या ५ संशयास्पद पिंपांची कसून तपासणी केली आणि त्या तेलाच्या पाच पिंपांच्या तळाशी लपवण्यात आलेले पांढऱ्या रंगाचे साहित्य सापडले. एनडीपीएस फील्ड किटने त्या पदार्थांची चाचणी केल्यावर, या सामग्रीमध्ये हेरोइनच्या असल्याचे आढळले. या तपासणीनंतर , या ५ डब्यांमधून आणलेले, २५.४५ किलो हेरोइन एनडीपीएस कायदा १९८५ च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले.

 

नवी मोडस ऑपरेंडी

अशाप्रकारे या प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीची नवीन कार्यपद्धती समोर आली आहे. तेलाच्या पिंपात लपवलेले हेरॉईन जप्त करण्याची ,कोणत्याही भारतीय तपास संस्थेची ही पहिलीच वेळ आहे, आयात कंटेनरच्या नेहमीच्या तपासणीदरम्यान ते शोधणे जवळजवळ अशक्य होते.

 

इराणमधील भारतीयाने पाठवले हेरॉइन

तपासात असेही निष्पन्न झाले की, इराणमध्ये बऱ्याच काळापासून वास्तव्याला असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीकडून आयात करणाऱ्या कंपनीचे नाव वापरले जात होते. इराणमधील त्याच्या जुन्या संबंधांचा वापर करून अफगाणिस्तानातून त्याने हा माल पाठवला होता. एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ६७ च्या तरतुदींखाली नोंदवलेल्या त्याच्या जबानीत, अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेल्या आयात मालाची खेप त्याच्याच मालकीची होती हे या व्यक्तीने कबूल केले असून त्याने त्याच्या अफगाण संबंधांविषयीचे तपशीलही दिले आहेत.

 

दिल्लीतून दोघांना अटक

या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना काल दिल्लीहून आणखी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांना आज मुंबईत ट्रान्झिट रिमांड अंतर्गत आणण्यात आले आहे. या मालाची आयात सुरळीत होण्याच्या दृष्टीने, हे दोघे हवालासह आर्थिक व्यवहारात सहभागी होते. पनवेल सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले, या न्यायालयाने त्यांची रवानगी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

मुंद्रा बंदरातील २१ हजार कोटींच्या जप्तीमुळे आता न्हावा शेवाची यादी?

  • याआधी जुलै महिन्यात महसूल गुप्तचर विभाग मुंबईने न्हावा शेवा बंदरावर मूळ अफगाणिस्तानातून आलेले 294 किलो हेरॉईन जप्त केले होते.
  • त्यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये डीआरआय मुंबईने अफगाणिस्तानमधून आलेल्या मालाच्या आणखी एका खेपेमधून न्हावा शेवा बंदरावर 191.6 किलो हेरोइन जप्त केले होते.
  • अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचा माल इराणच्या चाबहार / बंदर अब्बास या बंदरांमधून पाठवला जातो.
  • या मोठ्या जप्तींव्यतिरिक्त, डीआरआय मुंबईने गेल्या एका वर्षात कुरियर पार्सल तसेच आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे डझनभर प्रकरणात हेरॉईन आणि कोकेन काही किलोच्या प्रमाणात जप्त केले आहे.
  • देशाची सर्वोच्च तस्करी विरोधी संस्था असल्याने, महसूल गुप्तचर संचालनालय आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ वर्तुळाविरुद्ध प्रभावी अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे अंमली पदार्थांच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी काम करते.
  • कोणत्याही बंदरातून किंवा विमानतळांवरून अंमलीपदार्थ जप्तीची कारवाई नेहमी होत असते. मात्र, मुंद्रा बंदरात २१ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त झाल्यानंतर वेगळाच वाद रंगला. त्यामुळे आता इतर राज्यातील बंदरांमध्येही अंमली पदार्थ जप्त होत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न संपूर्ण यादी सादर करून केल्याची चर्चा आहे.

Tags: Ayush KatheriaM. K. Singhआयुष कथेरियाएनडीपीएसएम के सिंगडीआरआय मुंबईन्हावा शेवा बंदरमहसूल गुप्तचर संचालनालय
Previous Post

देशातील आठ उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, ५ मुख्य न्यायमूर्तींची बदली

Next Post

बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल-राज्यपाल

Next Post
राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान 7

बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल-राज्यपाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!