मुक्तपीठ टीम
बीआरओत ड्राफ्ट्समन या पदासाठी १४ जागा, अॅडमिन सुपरवाइजर या पदासाठी ०७ जागा, सुपरवाइजर स्टोअर या पदासाठी १३ जागा, सुपरवाइजर सायफर या पदासाठी ९ जागा, हिंदी टायपिस्ट या पदासाठी १० जागा, कम्युनिकेशन ऑपरेटर या पदासाठी ३५ जागा, इलेक्ट्रिशियन या पदासाठी ३० जागा, वेल्डर या पदासाठी २४ जागा, ब्लॅक स्मिथ मल्टी स्किल्ड वर्कर या पदासाठी २२ जागा, मल्टी स्किल्ड वर्कर कुक या पदासाठी ८२ जागा अशा एकूण २४६ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.- १) १२वी उत्तीर्ण २) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र/ आयटीआय ड्राफ्ट्समन-सिव्हिल+१ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) पदवीधर २) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कर/ नौदल/ हवाई दलातील माजी नायब सुभेदार
- ३. पद क्र.३- १) पदवीधर २) मटेरियल मॅनेजमेंट/ स्टोअर्स कीपिंग/ इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र
- पद क्र.४- विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास १ अभ्यासक्रम उत्तीर्ण
- पद क्र.५- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर हिंदी टायपिंग
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय ऑटो इलेक्ट्रिशियन
- पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय वेल्डर- जी अॅंड ई
- पद क्र.९- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय ब्लॅक स्मिथ/ फोर्ज टेक्नोलॉजी/ हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी/ शीट मेटल वर्कर
- पद क्र.१०- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ यादरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शुल्क भरण्यासाठी https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156 ही लिंक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे-४११०१५
अधिक माहितीसाठी बीआरओच्या अधिकृत वेबसाइट http://www.bro.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://drive.google.com/file/d/11b9gg_5URiKDt6D490GoUTkptuSR3uJ0/view