मुक्तपीठ टीम
मुंबईतील १९ स्थानकांचा कायापलाट करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या योजनेसाठी ९४७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट ३ए अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन स्थानकांवर प्रवाशांच्या सोयी वाढवणे, नवीन फूट ओव्हर ब्रिज, एलिव्हेटेड डेक, स्कायवॉक इत्यादींचे बांधकाम करणार आहे. याशिवाय गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेवर एकूण दोन नवीन कारशेड बांधण्यात येणार आहेत.
एमआरव्हीसीच्या म्हणण्यानुसार, स्टेशन विकासाचे काम ७ टप्प्यात केले जाईल. ज्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील. काही दिवसांत काम सुरू होईल. मेनलाइन, हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर काम पाहिले जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी छोट्या स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे.
कायापालट कोणत्या स्थानकांचा होणार?
- रेल्वे स्थानकांच्या कायापालटात ११ स्थानके मध्य रेल्वेची आणि ८ स्थानके पश्चिम रेल्वेची असतील.
- यामध्ये भांडुप, मुलुंड, शहाड, नेरळ, कसारा, जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द, कांदिवली, मीरा रोड, वसई, नालासोपारा आणि विरारचा समावेश आहे.
- मुंबईत प्रवाशांची गर्दी असणारी ११९ उपनगरीय स्थानके आहेत.
- यातील बहुतांश स्थानके ८० वर्षांपासून जुनी आणि गर्दीची आहेत.
- पूर्वीच्या गाड्या १२ डब्यांच्या होत्या, आता १५ डब्यांच्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना हालचाल करण्याचे क्षेत्र कमी झाले आहे. हे लक्षात घेऊन स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे.
अंधेरीसारखे एलिव्हेटेड डेक बांधले जाणार!
- स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी हालचाल क्षेत्र वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
- त्यासाठी बोरिवली आणि अंधेरी स्थानकांसारखे एलिव्हेटेड डेक बांधले जाणार आहेत.
- हे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सर्व पादचारी पुलांशी लिंक केले जातील.
- स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था मजबूत केली जाईल.
- जवळपास १६ स्थानकांवर एफओबी, एलिव्हेटेड डेक, स्कायवॉक, सेवा इमारतींचे स्थलांतर, स्टॉल आणि किऑस्कचे स्थलांतर, स्थानकांवर हिरवे क्षेत्र वाढवणे आणि इतर विद्युत सुविधांची गरज आहे.
भिवपुरी, वाणगाव येथे अत्याधुनिक कारशेड!
- पश्चिम आणि मध्य रेल्वेवर हायटेक कारशेड तयार करणार आहे.
- त्यासाठी कर्जतमधील भिवपुरी आणि पालघरमधील वाणगाव येथे भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
- ३३ हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये अशी कारशेड बांधण्याची योजना आहे.
- या कारशेड बनवण्याचा निर्णय २०१९ मध्येच घेण्यात आला.
- या कारशेडमध्ये पार्किंग, देखभाल, निरिक्षण, दुरुस्ती इत्यादी कामे केली जाणार आहेत.
पाहा व्हिडीओ: