मुक्तपीठ टीम
सध्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे जुळ्या बाळांचे प्रमाण वाढल्याचा दावा ऑक्सफर्ड यनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. जगात दर सेकंदाला ४ बाळं जन्म घेतात. जगातील प्रत्येक ४० वे बाळ हे जुळे म्हणून जन्माला येते. आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे होणारा जन्म हे याचे मुख्य कारण असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. एका संशोधनातील दाव्यानुसार, दरवर्षी सुमारे १६ लाख जुळ्या बाळांचा जन्म होतो. ही संख्या गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक आहे. संशोधकांनी २०१०-२०१५ या काळातील १३५ देशांमधून यासंबंधित सांख्यिकी गोळा केली आहे.
संशोधकांनी सादर केलेल्या अहवालाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
• सर्वात जास्त जुळी बाळे होण्याचे प्रमाण अफ्रिकेमध्ये आहे.
• २० व्या शतकाच्या मध्यानंतर जुळ्या बाळांची संख्या आता सर्वाधिक आहे.
• आता जुळे जन्माचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाईल.
• विकसित देशांमध्ये १९७० च्या दशकांपासून प्रजनन तंत्रज्ञानाला पाठिंबा देण्यासाठी एआरटी चा उदय झाला.
• या तंत्रज्ञानामुळे जुळी बाळं अधिक जन्माला येत आहेत.
• गर्भनिरोधकांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे.
• लग्नाचे वय पुढे जात असल्याचाही परिणाम होत आहे.
संशोधन अहवालानुसार, “अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जुळ्या बाळांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आफ्रिकेमध्ये तर बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये आई आपल्या जुळ्या मुलांना गमवतात. संशोधनानुसार याची संख्या दरवर्षी २ ते ३ लाखांपर्यंत आहे.