Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी १५३५ उमेदवार पात्र

November 22, 2022
in सरकारी बातम्या
0
MPSC

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ व १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ संयुक्त पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी १५३५ उमेदवार पात्र ठरले. याबाबतचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.            

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाच्याआधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदांची संख्या ३७६ असून शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेले उमेदवार संख्या १५३५ आहे.            

या निकालाआधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व अर्जात प्राविण्यप्राप्त (गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी वैध क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहणार आहे.             

पोलीस उपनिरीक्षक पदाचा शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरुन स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.            

शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.निकालातील अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाचे परीक्षोत्तर उपसचिव (अप) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.


Tags: MaharashtraMPSCmumbaiPhysical TestSub Inspector Cadreपोलीस उपनिरीक्षकशारीरिक चाचणी
Previous Post

पारंपरिक, ऐतिहासिक वातावरणात शिवप्रतापदिन होणार साजरा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Next Post

शिवडी – वरळी उन्नत मार्गातील रहिवाशांचे शिरोडकर मंडईत पुनर्वसन

Next Post
Worli SHivdi

शिवडी - वरळी उन्नत मार्गातील रहिवाशांचे शिरोडकर मंडईत पुनर्वसन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!