मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा उद्रेक सर्वचं क्षेत्रात पाहायला मिळत आहे, यात देशातील मोठ्या खत उत्पादक कंपन्यांपैकी एक यारा फर्टिलायझरलाही याचा फटका बसला आहे. या कंपनीमध्ये १२५ कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत, कोरोनामुळे एका कर्मचाऱ्याची आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील युवतीचा मृत्यू झाला आहे.
दहा दिवसांपूर्वी जेव्हा यारा फर्टिलायझरच्या उत्तरप्रदेशातील कारखान्यातील एका कर्मचाऱ्याची चाचणी केली गेली, तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांची कोरोना चाचण्या सुरू केल्या.
आतापर्यंतच्या माहितीनुसार कंपनीच्या सुमारे १२५ कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात कोरोनाने एका कर्मचाऱ्याची आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील युवतीचा मृत्यू झाला आहे. यारा फर्टिलायझर संबंधित काही कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही.