मुक्तपीठ टीम
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या ५० डॉक्टरांचा मृत्यू रविवारी एकाच दिवशी झाला आहे. यावर्षी भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्यावर्षी देशात ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत, कोरोनामुळे देशात १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कोरोनाशी लढताना प्राण गमावणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढतेच आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचेच मृत्यूसत्र
• यावर्षी कोरोना संकटात २४४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
• या रविवारीच एका दिवसात ५० डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
• बिहारमध्ये सर्वाधिक ६९ डॉक्टर मृत्यूमुखी पडले आहेत.
• उत्तर प्रदेशात ३४ आणि दिल्लीत २७ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
• यापैकी फक्त ३% डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेत होते.
भारतात लसीकरण सुरू झाल्यापासून ५ महिने उलटले असून अद्यापही देशातल्या फक्त ६६% आरोग्य कर्मचार्यांना लस मिळाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून डॉक्टरांना सतत लस देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
आयएमएचे आवाहन, सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी
• आयएमएचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले म्हणाले, रविवारी ५० डॉक्टर गमावले हे दुर्दैव आहे.
• एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत २४४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
• ते म्हणाले की अजूनही असे बरेच डॉक्टर आहेत ज्यांनी कोरोना लस घेतली नाही.
• ते म्हणाले की, सर्व आरोग्य कर्मचार्यांना लसी देण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.