मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातच नाही तर देशात सत्तापदावर असताना सामाजिक क्रांती घडवणारे राजे म्हणजे शाहू महाराज! त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व संपन्न होत आहे. ६ मे हा शाहू महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथीचा दिवस. त्यासाठी सकाळी १० वाजता १०० सेंकद स्तब्धता पाळून कोल्हापूरकर या लोकराजाला आदरांजली वाहणारायत. एक इतिहास घडणार आहे.
या अभिनव उपक्रमाचा प्रचार प्रसिद्धीसाठी एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. शंभर सेकंदाच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरही गाजला. राजर्षी शाहूंना तमाम कोल्हापूरकरांनी शंभर सेकंद स्तब्धता पाळून एकाच वेळी आदरांजली वाहण्याचं आवाहन या व्हिडीओत आहे. तसे आवाहन करणारा व्हिडीओ प्रसिध्द जाहिरातकार अनंत खासबारदार, ऐश्वर्य मालगावे यांच्या संकल्पनेतून तयार झाला आहे. हा व्हिडिओ तयार करताना दाभोळकर कॉर्नर दहा मिनिटे स्तब्ध ठेवून शूटिंग पूर्ण करण्यात आले होते.
राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वात उपक्रमांची रेलचेल
- शंभर सेकंद स्तब्धता पाळून एकाच वेळी आदरांजली
- कोल्हापूर राजर्षी शाहूंना कोल्हापूरकर शंभर सेकंद स्तब्धता पाळून एकाच वेळी आदरांजली वाहणार आहेत.
- या कार्यक्रमाचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर होऊ लागला आहे.
- प्रसिध्द जाहिरातकार अनंत खासबारदार, ऐश्वर्य मालगावे यांच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ तयार झाला आहे.
- हा व्हिडिओ तयार करताना दाभोळकर कॉर्नर दहा मिनिटे स्तब्ध ठेवून शूटिंग पूर्ण करण्यात आले.
रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत-
- छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या पायाभरणीला ३ मेला १३४ वर्षे पूर्ण झालीत.
- याच निमित्ताने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वांरत्गत कोल्हापुरात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पेढे वाटून करण्यात आले.
‘जागर शाहू कर्तृत्वा’चा –
- लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात ‘जागर शाहू कर्तृत्वाचा’ या विषयावर एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन केले.
- विवकानंद महाविद्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांचे व्याख्यान यावेळी झाले.
- शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात मुख्य व्याख्यान झाले असून अर्थ व कृषी तज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी संवाद साधला.
भवानी मंडपात युवा जागृती पथनाट्ये-
- राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त वारसा राजर्षी शाहूंचा जागर युवाशक्तीचा या माध्यमातून भवानी मंडपात गुरुवारी सकाळी आठ वाजता पथनाट्य सादर करण्यात आले.
- शिवराज्याभिषेक महोत्सव समिती. शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व माध्यमिक शाळांच्या माध्यमातून शाहू महाराज यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित १०० मिनिटांचे पथनाट्य सादरीकरण यावेळी झाले.
- या पथनाट्यात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनाचे हजार स्वयंसेवकही सहभागी होते.
कँडल मार्च-
- राजर्षी शाहू स्मृती शताब्दी पू्र्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी सात वाजता दसरा चौक ते शाहू समाधी स्थळ या मार्गावर कँडल मार्च काढण्यात आली.
- समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतीला या अनोख्या उपक्रमातून अभिवादन करण्यात आले.
- कोल्हापुरातील सर्व समाजाच्या बोर्डिंगमधील विद्यार्थी उपस्थित राहून शाहू महाराजांना आंदरांजली वाहिली.
राज्य नाट्य स्पर्धेचे अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
- लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्षास अभिवादन म्हणून स्पर्धेची ही अंतिम फेरी कोल्हापुरात होत आहे.
- यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवनचरित्रावर आधारित “राजर्षी आणि संगीतसूर्य -नाट्यनगरीच्या नवलकथा” हा कार्यक्रम सादर होणार आहे.
पाहा व्हिडीओ: