मुक्तपीठ टीम
देशातील माध्यम आणि मनोरंजन उद्योग जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मीडिया उद्योगांपैकी एक आहे आणि २०३० पर्यंत १०० अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी जीडीपीमध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचा वाटा एक टक्क्यांहून अधिक वाढवण्यावर भर दिला आहे. २०३०पर्यंत या उद्योगाशी संबंधित बाजारपेठ सध्याच्या २८ अब्ज डॉलरवरून १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. असे त्यांचे म्हणणे आहे.
अपूर्व चंद्रा यांनी दुबई एक्स्पोमध्ये भारतीय पॅव्हेलियनचे उद्घाटन करताना ही माहिती दिली. देशातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग सध्या २८ अब्ज डॉलर्सचा आहे.
माध्यम-मनोरंजन उद्योगासाठी प्रतिभा आणि रचनात्मक कौशल्यावर भर दिला जाणार!
- मुंबईत फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, फ्रेम्स फास्ट ट्रॅकच्या उद्घाटन सत्रात अपूर्व चंद्रा म्हणाले की, एका दशकात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल.
- या काळात, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाने हे देखील ठरवले पाहिजे की हे क्षेत्र २०३०पर्यंत १०० अब्जपेक्षा जास्त होईल.
- माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत करेल.
- फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस इन्व्हेस्ट इंडिया आणि नॅशनल सिंगल विंडो पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहे.
एव्हीजीसी या विषयावर धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येणार…
- एव्हीजीसी म्हणजेच अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स उद्योगाला प्रचंड वाव आहे.
- मंत्रालय ‘अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स’ या विषयावर धोरण तयार करण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस एक टास्क फोर्स तयार करेल.
- या क्षेत्रातील कंपन्यांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- ते म्हणाले, “चर्चा होऊनही, एव्हीजीसी उद्योगाने सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दिशेने प्रगती केली नाही हे दुर्दैवी आहे.
- तसेच, मंत्रालयाच्या ४८% वाटा असलेल्या एव्हीजीसी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेसाठी ते १५ दिवसांत केंद्राला अहवाल सादर करणार आहेत.
पाच वर्षांत देशातील चित्रपटगृहांची संख्या १२ हजारावरून ८ हजारपर्यंत ६६ टक्क्यांनी घटली आहे. या कालावधीत चीनमधील संख्या १० हजारावरून ७० हजारापर्यंत वाढली आहे. भारतीय चित्रपट चीनमध्ये चांगला व्यवसाय करत आहेत.