Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कुस्ती, कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षिसासाठी पुढील वर्षापासून एक कोटी निधी

May 12, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
kabaddi

मुक्तपीठ टीम

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांप्रमाणेच शासनाकडून महाराष्ट्रात राज्यस्तरावर चार मोठ्या स्पर्धा भरविण्यात येतात. राज्यातील नविन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धांमध्ये कुस्ती, कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. या प्रत्येक स्पर्धेसाठी सध्या ७५ लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो. तो निधी पुढील वर्षापासून एक कोटी रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे.

चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात विभागस्तरावरील क्रीडा संकुलासाठी ५० कोटी, जिल्हास्तरावरील क्रीडा संकुलासाठी २५ कोटी, तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील, असे प्रतिपादान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापु क्रिडानगरी पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या युवा राष्ट्रीय हॉलिबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार मानसिंगराव नाईक, आशियाई हॉलिबॉल फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रामअवतार जाखड, प्रांताधिकारी संपत खिलारी, जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे, महाराष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील, पी. आर. पाटील, भारतीय हॉलिबॉल संघाचे महासचिव अकी चौधरी, ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडु महमंद मुल्ला आदी उपस्थित होते.

राज्यातील खेळाडूचे हित जपण्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूना वर्ग 1 व वर्ग २ च्या नोकऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार सरकारकडून देण्यात येत आहेत. असे सांगून, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विविध खेळामध्ये प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांनी योग्य मार्गदर्शन व पाठबळ देणे आवश्यक आहे. खेळामध्ये लक्ष घातल्यानंतर शैक्षिणक नुकसान होईल या भावनेतून खेळाडुंची अडवणूक करु नये. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्यानूसार त्याला प्रशिक्षण द्यावे, शासन खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना पाठबळ द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध स्पर्धा राज्यामध्ये भरविता आल्या नाहीत. उत्तमातील उत्तम खेळाडु आपल्या राज्यामध्ये आहेत. परंतु त्यांना संधी देता येत नव्हती. आता परिस्थिती बदलेली आहे. आता त्या दोन वर्षाचा बॅकलॉक भरुन काढावयाचा आहे. राज्यात आयपीएल, प्रो-कब्बडी स्पर्धांच्या धर्तीवर राज्यातही हॉलिबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. राज्यातील खेळाडुना विविध सवलतीही देण्यात येत आहे. राज्यातील सर्व खेळाडुंच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे.

यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील हॉलिबॉलच्या स्पर्धा भरविण्याचा मान यावेळी महाराष्ट्राला मिळाला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून यामुळे येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा क्षेत्रात कामगिरी केल्यास थेट शासकीय सेवा करण्याची संधी शासन उपलब्ध करुन देते. त्यामुळे हे ही आता एक प्रकारचे करिअर झाले आहे. प्रो-लिग कब्बडी प्रमाणे, प्रो-लिग हॉलिबॉल स्पर्धाही येत्या काळात भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.

प्रास्ताविक महाराष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले. यावेळी आमदार मानसिंग नाईक, रामअवतार जाखड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलन करुन क्रिडा ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र हॉलिबॉल संघाचे नेत्वृत्व करणाऱ्या अभिनंदन धामणकर याने क्रिडा शपथ दिली. या स्पर्धेत विविध राज्यातील 22 पुरुष व 20 महिला संघांनी सहभाग घेतला आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newsholiball competitionsInternational competitionislampurkabaddiKho-KhoLoknete Rajarambapu Kridanagari Police Parade GroundMinister of State for Home Affairs Satej Patilmuktpeethnational level competitionprizesWrestlingआंतरराष्ट्रीय स्पर्धाइस्लामपूरकबड्डीकुस्तीखो-खोगृहराज्यमंत्री सतेज पाटीलचांगली बातमीबक्षिसमुक्तपीठराष्ट्रीयस्तर स्पर्धालोकनेते राजारामबापु क्रिडानगरी पोलीस परेड ग्राऊंडहॉलीबॉल स्पर्धा
Previous Post

पुस्तकाच्या गावानंतर साताऱ्यात मधाचं गाव! महाबळेश्वरच्या मांघरला मिळाला बहुमान!!

Next Post

डीआरडीओत ज्युनियर रिसर्च फेलो पदावर संधी, लवकर करा अर्ज!

Next Post
drdo

डीआरडीओत ज्युनियर रिसर्च फेलो पदावर संधी, लवकर करा अर्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!