गेल्या काही महिन्यांपासून जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाचा प्रभाव आता हळुहळु कमी होऊ लागला आहे. कोरोना व्हॅक्सिनच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या कानी पडत असल्याने येत्या नव वर्षात कोरोना व्हॅक्सिन येईल अशी आशा सर्वांना लागली आहे. दरम्यान, सीरम इंस्टीट्युटने ऑफ इंडीया आणि भारत बायोटेक येत्या नोव्हेंबरमध्ये इंट्रानोजल कोरोना व्हॅक्सिनची शेवटची चाचणी सुरु करेल अशी शक्यताय.
आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितल्या प्रमाणे सध्या भारतात कोणतेच इंट्रानोजल कोरोना व्हॅक्सिनची चाचणी सुरु झालेली नाही. मात्र लवकरच सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया किंवा भारत बायोटेकला यांची परवानगी मिळाल्यावर या व्हॅक्सिन क्लिनिकल चाचणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनासाठी रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक-५ या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी डीसीजीआयने परवानगी दिली असल्याची माहिती हैदराबादमधील औषध कंपनी डीआरएलने दिली आहे.