महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, १६ मार्च २०२१: आज राज्यात १७,८६४ नवीन रुग्णांचे निदान. आज ९,५१० रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण १,३८,८१३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७७ % एवढे झाले आहे. राज्यात आज ८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ८७ मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. ६,०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.