तुम्हाला तुमच्या बचतीवर जास्त व्याज पाहिजे ? खरं तर हा प्रश्नच गैरलागू. कारण प्रत्येकालाच जास्त फायदा मिळत असेल तर पाहिजेच असतो. तुम्ही कसे अपवाद असाल? तसं तर जास्त व्याज अनेक आर्थिक संस्था देत असतात पण जेवढं व्याज जास्त तेवढाच धोका जास्त असं आजवर मानलं गेले आहे. मात्र, आता सुरक्षा आणि जास्त व्याज एकत्र मिळवण्याची संधी मिळाली आहे ते पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामुळे.
तुम्हाला जर बचत खातं उघडायचे असेल तर आता बँकेऐवजी पोस्टाकडे वळा. स्थानिक पोस्ट ऑफिसमध्येच बचत खाते उघडणे जास्त योग्य राहिल. पोस्टाच्या बचत खात्यात तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळतेच पण बँकांसारख्या सुविधाही मिळतात.
पोस्ट बचत खात्याचे फायदे
· पोस्टाच्या बचत खात्यात 4 टक्के वार्षिक व्याज मिळते.
· सध्या खाजगी बँका किंवा आर्थिक संस्था वगळता सरकारी बँकांमध्ये 4 टक्के व्याज मिळत नाही
· दहा हजारापर्यंतचे व्याज करमुक्त असते.
· पोस्टाच्या बचत खात्यात फक्त 500 रुपये किमान रक्कम ठेवावी लागते.
· पोस्ट बचत खात्यासोबत तुम्हाला एटीएम कार्ड आणि चेक बुकही मिळते.
· पोस्टातील बचत खाते सुरु राखण्यासाठी तीन आर्थिक वर्षांमध्ये किमान एकदा तरी व्यवहार आवश्यक आहे.
पोस्टात कोण उघडू शकते खाते ?
· पोस्टातील बचत खाते लहान मुलांसाठीही आहे
· 10 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर स्वत: खातेधारक खाते वापरू शकतो.
· पोस्ट बचत खाते दोन व्यक्ती संयुक्तरीत्याही उघडू शकतात.
· एखच व्यक्ती एका पेक्षा जास्त बचत खातीही उघडू शकतात
पोस्टात कसे उघडायचे बचत खाते ?
· पोस्टात बचत खाते उघडण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो.
· हा अर्ज पोस्टात मिळतो किंवा ऑनलाइन डाऊनलोड करता येतो.
· खाते उघडण्यासाठी KYC केव्हायसी – आपली ओळख पटवणारी पूर्ण माहिती द्यावी लागते.
· अर्ज भरल्यानंतर पोस्टात जमा करावा
· पोस्ट कार्यालय आपले बचत खाते उघडते
केवायसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
· पत्त्याचा पुरावा म्हणून मतदार ओळख पत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजेचे बिल, फोन बिल, आधार कार्ड हे स्वीकारले जातात.
· ताजा पासपोर्ट आकाराचा फोटो