अनेक जण पोटदुखीच्या समस्येला त्रासलेले असतात. यात पोटात मुरड येण्याच्या समस्येने अनेकजण हैराण झाल्याचे पाहायला मिळते. सतत जुलाबा होणाच्या त्रासामुळेही पोटात मुरड येऊ शकतो. इरिटेबल बॉल सिंड्रम म्हणजेच आयबीएस ही एक अशी समस्या आहे ज्यात व्यक्तीला सतत पोटात कळ आल्यासारखे वाटते मात्र पोट साफ होत नाही. त्यामुळे आज आपण अशा असह्य करणाऱ्या वेदना नक्की कशामुळे येतात हे जाणून घेणार आहोत.
आयबीएस ही समस्या मुख्यत्वे मोठ्या आतड्यातील बिघाडामुळे निर्माण होते. यामध्ये पोटात गॅस होणे, पोट फुगणे, पोटात मुरड येणे यांसारखे प्रकार संभवतात. ही समस्या एका दिवसात कमी होत नाही. त्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींवर आवर घालावा लागतो. आयबीएसमुळे कोलोरेक्टर कॅन्सर होतो असा बऱ्याच जणांचा समज आहे. मात्र हा समज साफ चुकीचा आहे.
आयबीएस स्वत:च्या बॉल टिशुजमध्ये कधीच कोणतेच बदल घडवून आणत नाही. त्यामुळे पोटात नक्की मुरड कशामुळे येते किंवा दरम्यान ओटीपोटात भरपूर का दुखतं? हा प्रश्न सगळ्यानाच पडत असतो.
आतड्यांमधील स्नायू हे वेगवेगळ्या थरांनी बनलेले असतात. त्यामुळे आपण ज्यावेळी काही खातो त्यावेळी त्या थरांची हालचाल होते व ते एकमेकांना घासले जातात. आतड्यांमध्ये जखम झाल्यावर त्यातील थर संकुचन पावल्यामुळे वेदना होतात.
आपण जेव्हा शौचासाठी जातो त्यावेळी सुद्धा थर संकुचन पावल्यामुळे वेदना होतात. अन्न, जीवनशैली, चुकीची औषधे किंवा अन्य काही कारणांमुळे शरीरातील नर्व्स सिस्टीममध्ये बिघाड होत असल्याने मेंदू आणि पचनेंद्रियांमधील संदेशाचे देवाण-घेवाण योग्यप्रकारे होत नाही. यामुळे पोटात गॅस तयार होतो किंवा ओटीपोटात भरपूर दुखते.
आयबीएसग्रस्त लोकांच्या आतड्यात रोगप्रतिकारक शक्तीच्या बऱ्याच पेशी विकसित होतात. या पेशींमुळे आतड्यात जळजळ होते व तीव्र वेदना जाणवतात. याशिवाय निरोगी जिवाणुंच्या स्थितीत बदल झाल्यास पोटात मुरड येऊ शकते. त्यामुळे असे होत असल्यास योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.