सदाबहार चित्रपट म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध चित्रपट “कुछ कुछ होता है” आज देखील टिव्हीवर लागताच अनेकजण आवडीने तो पाहण्यास बसतात. आई देवाघरी गेल्यावर वडीलांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी छोटी अंजली तिच्या आई व वडीलांच्या मैत्रिणीला पुन्हा त्यांच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करते. ही कथा दिग्दर्शकाने अगदी उत्तमरीत्या मांडली त्यामुळे प्रेक्षकांच्या मनाला आजदेखील ती कथा भावते.
या चित्रपटात शाहारुख, काजल आणि राणी मुखर्जीने व छोटी अंजली म्हणजेच सना सइदने काम केले आहे. यांच्यासोबत अजुन एक बालकलाकार होता तो म्हणजे सायलेंट सरदार. या छोट्याशा सायलेंट सरदारला चित्रपटात २ ते ३ डायलॉग होते परंतु तरीही प्रेक्षकांनी त्यांचे खुप कौतुक केले. छोटी मुलं कधी मोठी होतात हे समजत नाही. “कुछ कुछ होता है” या चित्रपटातील छोटा सरदार आता मोठा झाला असUन लवकरच तो लग्न बंधनात अडकणार आहे. या छोट्या सायलेंट सरदारचे नाव परजान दस्तूर असे आहे. पुढच्या चार महिन्यात लग्न करणार आहे.
परजान दस्तूरने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये डेलना श्रॉफ हिच्यासोबत साखरपुडा केला होता. त्यावेळी त्यांने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तो फेब्रुवारी 2021 मध्ये लग्न करत असल्याचे सांगितले होते. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘एक वर्षापूर्वी असाच सुंदर दिवस होता, जेव्हा ती हो म्हणाली. आता फक्त 4 महिने बाकी आहेत’.
परजानने “कुछ कुछ होता हे” नंतर कहो ना प्यार है, हाथी का अंडा, ब्रेक के बाद, है दिल बार बार, हम तुम परजानिया, पॉकेट मम्मी, कभी खुशी कभी गम अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००९ मध्ये पियुष झाच्या सिकंदर या चित्रपटात परजनने लीड रोलमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.