Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इमिटेशन ज्वेलरी मालकाला खंडणीसाठी धमकाविणार्‍या दोघांना अटक

December 22, 2020
in कायदा-पोलीस
0
इमिटेशन ज्वेलरी मालकाला खंडणीसाठी धमकाविणार्‍या दोघांना अटक

मुंबई :- इमिटेशन ज्वेलरी मालकाला खंडणीसाठी धमकाविणार्‍या दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. संजय पांडे आणि अजीत सिंग अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा त्यांचा तिसरा सहकारी पप्पू नेपाळी हा पळून गेला असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील तक्रारदार मालाड परिसरातील एका इमिटेशन ज्वेलरी कारखान्यात कामाला आहे. या कारखान्यात त्याच्यासह इतर वीस कर्मचारी कामाला आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा वाजता सर्व कर्मचारी कामात असताना अचानक तिथे तीन तरुण आले, या तिघांनी तक्रारदाराला त्याच्या मालकाविषयी विचारणा करुन त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. दरमाह खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांना तिथे व्यवसाय करता येणार नाही अशी धमकी दिली. या तिघांकडून चॉपरसह गावठी कट्टा होता, घातक शस्त्रांच्या धाकावर या तिघांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत पैसे तयार ठेवण्यास सांगितले. जाताना त्यांनी तक्रारदारांना मारहाणही केली होती.

या घटनेनंतर त्याने ही माहिती त्याच्या मालकासह कुरार पोलिसांना दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या पथकाने मालाड परिसरातून संजय पांडे आणि अजीत सिंग या दोघांना अटक केली. यातील संजयविरुद्ध बारा तर अजीतविरुद्ध सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तिसरा सहकारी पप्पूविरुद्ध आठ गुन्ह्यांची नोंद आहे, त्यात खंडणीसह गंभीर दुखापत, हत्येचा प्रयत्नाचा समावेश आहे. या दोघांनी या मालकाला खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या तिसर्‍या सहकार्‍याचा आता पोलीस शोध घेत आहेत.


Previous Post

वांद्रे येथे व्यावसायिकाचे अपहरण करुन लुटमार

Next Post

अभिनेत्रीवर चाकू हल्ला करणर्‍या निर्मात्याला पोलीस कोठडी

Next Post
अभिनेत्रीवर चाकू हल्ला करणर्‍या निर्मात्याला पोलीस कोठडी

अभिनेत्रीवर चाकू हल्ला करणर्‍या निर्मात्याला पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!