Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“माणसं मरत असताना डोळझाक करायची? …तर केंद्र सरकारवर न्यायालयाची अवमानना कारवाई!”

दिल्लीत आजही ऑक्सिजनअभावी डॉक्टरसह आठ मृ्त्यू, न्यायालयाकडून गंभीर दखल

May 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Batra Hospital

मुक्तपीठ टीम

देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या भीषण उद्रेकातील ऑक्सिजन टंचाईसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे. दिल्लीला ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. जर आजच तेवढा पुरवठा केला नाही तर केंद्र सरकारवर न्यायालय अवमानना कारवाई करणार आहे.

 

देशातील आणि त्यातही दिल्लीतील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली उच्च न्यायालय सातत्याने सुनावणी घेत आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने आदेश टाळावा, अशी विनंती केली जाताच, न्यायमूर्तींनी फटकारले, “माणसं मरत असताना आम्ही डोळेझाक करायची का?”

 

आज काय म्हटलं न्यायालयानं?

  • सुनावणी दरम्यान दिल्लीतील रुग्णालयांनी ऑक्सिजनअभावी अद्भवत असलेल्या भीषण परिस्थितीची माहिती दिली. त्यांना येत असलेले अनुभवही सांगितले.
  • दिल्लीतील बत्रा रुग्णालायच्या व्यवस्थापनाने त्यांच्या रुग्णालयात एका ज्येष्ठ डॉक्टरांसह आठ रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
  • त्यानंतर न्यायालयानं बजावलं, केंद्र सरकारनं आजच दिल्लीतील रूग्णालयांना ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन द्यावा.
  • पाणी डोक्यावर गेले आहे, आता केंद्र सरकारला ऑक्सिजनची व्यवस्था करावीच लागेल.
  • ऑक्सिजन पुरवठा फक्त कागदावर नसावा आजच प्रत्यक्षात व्हावा
  • जर केंद्र सरकारने आज दिल्लीच्या वाट्याचा ऑक्सिजन पुरवला नाही तर केंद्र सरकारविरोधात न्यायालयाला अवमानना कारवाई करावी लागेल.

 

8 dead at Batra hospital after oxygen supply reaches late. 6 of them were on ICU on high flow Oxygen. Among those who died is a doctor of the hospital from the gastro Dept. Dr. SCL Gupta, Medical Director, Batra speaking about the incident 👇🏾@TOIDelhi pic.twitter.com/GqFJpaY0bl

— Sakshi Chand (@sakshichand8TOI) May 1, 2021

न्यायालयाने रुग्णालयांनाही जबाबदारीची जाणीव करुन दिली

  • रुग्णालयांनीही जे दहा दिवसांपासून दाखल आहेत, ज्यांना रोज दाखल आणि सोडण्यात येत आहे, अशा सर्व रुग्णांची माहिती द्यावी.
  • रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लांट लावावेत.
  • रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या टंचाईपासून शिकावे आणि या प्राणवायूची निर्मिती करणारे प्लांट लावावेत.
  • काही रुग्णालये व्यवसायिक हित पाहतात ऑक्सिजन प्लांट्ससारख्या आवश्यक बाबींवर भांडवली गुंतवणूक कमी करतात.
  • विशेषत: मोठ्या रुग्णालयांसाठी हे प्लांट आवश्यक असतात.

 

ये खबर बहुत ही ज़्यादा पीड़ादायी है। इनकी जान बच सकती थी -समय पर ऑक्सिजन देकर

दिल्ली को उसके कोटे की ऑक्सिजन दी जाए। अपने लोगों की इस तरह होती मौतें अब और नहीं देखी जाती। दिल्ली को 976 टन ऑक्सिजन चाहिए और कल केवल 312 टन ऑक्सिजन दी गयी। इतनी कम ऑक्सिजन में दिल्ली कैसे साँस ले? https://t.co/h7C5bcFtD6

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 1, 2021

ऑक्सिजनअभावी आठ जणांचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू

आजच दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना संक्रमित आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टरांचाही समावेश आहे. अन्य पाच गंभीर रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली. राजधानीतील विविध रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा संपण्याच्या मार्गावर असल्याचे सांगून एसओएस जारी केले होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बत्रा रुग्णालयानेही दिल्ली उच्च न्यायालयात संपर्क साधला. एका तासापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही, असे हॉस्पिटलने कोर्टाला सांगितले, त्यामुळे कोरोनाचे आठ रुग्ण मरण पावले. मेलेल्यांमध्ये डॉक्टरही आहे. दिल्ली सरकारसुद्धा सतत असे म्हणत आहे की त्यांना आपल्या वाट्याचा ऑक्सिजनही मिळत नाही.

ं

 

25 lives lost at Gangaram hospital, 20 lives at Jaipur Golden hospital and now 8 lives at Batra hospital lost due to lack of oxygen.

Hospitals in Delhi have been ringing alarm bells for weeks now. But this is STILL happening. Why is this being allowed to happen? https://t.co/aBUMcw4kx9

— Ruchira Chaturvedi (@RuchiraC) May 1, 2021

ं

 

The need of the hour is to fight this crisis as one, with a spirit of cooperation.

Must read this piece by my dear friend Sh @AnupamPKher Ji calling for an end to the ‘find & feast approach’ by people pushing vested interests in these unprecedented timeshttps://t.co/Q6ctBUGGQT

— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 1, 2021

ं

 

Hospital employees paying respects to a doctor who died due to the oxygen shortage at Batra Hospital. 😔😔😔 Via @ikasnik @the_hindu pic.twitter.com/PzrCX6Q65a

— Nistula Hebbar (@nistula) May 1, 2021


Tags: coronacourt warn central government of contemptdelhioxygen shortageऑक्सिजन टंचाईकेंद्र सरकारला न्यायालयाचा इशाराकोरोनादिल्ली रुग्णालय मृत्यून्यायालयाची अवमानना
Previous Post

आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार मे. टन डाळ शिल्लक, रावसाहेब दानवेंचा आरोप

Next Post

“सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?”

Next Post
chandrakant patil

"सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!