भारताची शान वाढवणाऱ्या इस्त्रोनं आज पुन्हा एकदा अवकाशात उंच भरारी घेतलीय. आज 3 वाजुन 2 मिनिटांनी इस्रोचे पीएसएलव्ही-सी 49 ने 10 उपग्रहांसह अवकाशात झेप घेतली. पीएसएलव्ही सी-49 आपल्या देशाचा रडार इमेजिंग उपग्रह आणि इतर 9 विदेशी उपग्रहांना अवकाशात घेऊन गेला. सर्व उपग्रह त्यांच्या कक्षांमध्ये स्थापित झालेयत. आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रोनं अवकाशात पाठवलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या 328 झालीय.
आजची मोहिम ही २०२०मधीव इस्त्रोची पहिलीच मोहिम आहे. या मोहिमेत दहा उपग्रहाचे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपण झाले. पीएसएलव्ही सी -49 ने एका भारतीय तर नऊ परदेशी उपग्रहांसह उड्डाण केले. 2020 मधील इस्त्रोची ही पहिलीच मोहिम आहे. प्रक्षेपित करण्यात आलेल्या 9 परदेशी उपग्रहांमध्ये लिथुआनिया (1-टेक्नोलॉजी डेमन्स्ट्रेटर), लक्झेंबर्ग (क्लीओ स्पेस बाय 4 मेरीटाइम अॅप्लिकेशन सॅटेलाइट)आणि यूएस (4-लेमुर मल्टी-मिशन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट) यांचा समावेश आहे.
ईओएस -01 अर्थ ऑब्झर्वेशन रीसेट ही उपग्रहांची एक प्रगत मालिका आहे. यात सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) आहे, जो कोणत्याही वेळी आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीवर नजर ठेवू शकतो. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो ढगाळ वातावरणात देखील पृथ्वीचे निरीक्षण करु शकतो. तसेच पृथ्वीचे स्पष्ट छायाचित्रंही घेणं शक्य असते. हा उपग्रह दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे. यामुळे भारताला रात्रंदिवस पृथ्वीवर नजर ठेवणं शक्य होणार आहे.