मुक्तपीठ टीम
यूट्युबने गेल्या तीन वर्षात निर्माते, कलाकार आणि माध्यम संस्थांना ३० अब्ज डॉलर्स दिले आहेत. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजसिकी यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “जे नवीन चॅनल्स कंपनीच्या भागीदार कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तर २०२० मध्ये त्यांचे उत्पादन जवळपास दुप्पट झाले आहे. एका अहवालानुसार, युट्यूबने २०१९ मध्ये अमेरिकेच्या जीडीपीमध्ये सुमारे १६ अब्ज डॉलर्सचे योगदान दिले असल्याचे समोर आले आहे. अर्थात युट्युबकडून मिळणारे उत्पन्न हे सर्वांनाच मिळते किंवा मिळवता येते असे नाही. त्यातही अनेक बाबी असतात.
यूट्युबचं दर्जा कसं राखतं?
• यूट्युबचे कर्मचारी पारदर्शकता, कंटेन्ट स्ट्राइक आणि जाहिरात उत्पन्नावर लक्ष ठेवतात.
• अल्गोरिदम एका विशिष्ट कालावाधीत बदलत राहावा लागतो.
• एखाद्या चॅनलवर कॉपीराइट कंटेन्ट वापरला जातो तेव्हा यूट्युब त्याला स्ट्राइक पाठवते.
• कोणत्याही एका चॅनलवर ९० दिवसात ३ स्ट्राइक येतात, तेव्हा त्या चॅनलला बंद केले जाते.
गूगल यूट्युबच्या दर्जा राखण्याच्या आग्रहाबद्दल एक उदाहरण दिले जाते. हे उदाहरण अमेरिकेतील २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीतील आहे. मतदारांची फसवणूक करण्याबद्दलचा एक व्हिडीओसमोर आला होता. युट्यूब धोरणांचे उल्लंघना केल्यामुळे तो व्हिडीओ अपलोड करणारे ते चॅनल बंद करण्यात आले. कंपनीने आपले नवीन धोरण डिसेंबर २०२० मध्ये लागू केले आहे. यूट्युबच्या काही अधिकाऱ्यांवर चुकीची माहिती देणारे व्हिडीओ थांबवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना सतत यूट्युबवर अपलोड होणाऱ्या कन्टेंटवर नजर ठेवणे भाग पडते.
सर्वात लोकप्रिय टॉप-१० यूट्युब चॅनल्स
१. टी-सीरीज- १६.९ कोटी सब्सक्राइबर्स
२. PewDiePie- १०.८ कोटी सब्सक्राइबर्स
३. कोकमेलॉन-नर्सरी राइम्स- १०.३ कोटी सब्सक्राइबर्स
४. सेट इंडिया- ९.४४ कोटी सब्सक्राइबर्स
५. डब्ल्यूडब्ल्यूई- ७.२४ कोटी सब्सक्राइबर्स
६. ५-मिनट क्राफ्ट- ७.०६ कोटी सब्सक्राइबर्स
७. जी म्यूजिक कंपनी- ६.८ कोटी सब्सक्राइबर्स
८. कनॅल कोंडजिला- ६.३ कोटी सब्सक्राइबर्स
९. जस्टिन बीबर- ६.०६ कोटी सब्सक्राइबर्स
१०. डूड परफेक्ट- ५.४९ कोटी सब्सक्राइबर्स