मुक्तपीठ टीम
पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणऱ्या काश्मीरमध्ये लवकरच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पाहायला मिळणार आहे. जम्मूच्या रियासीपासून काश्मीरला जोडणार्या रेल्वे मार्गावर बांधल्या जाणाऱ्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या कमानीच्या दोन्ही बाजू जोडलेल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा पूल तयार होईल, अशी अपेक्षा आहे.
सर्वात उंच पुलाची गोष्टच न्यारी
• या रेल्वेपुलाची उंची ३५९ मीटर आहे.
• हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असेल.
• पुलाचा निर्मिती खर्च २८,००० कोटी रुपये असेल.
• या पुलावर मायनस २० डिग्री सेल्सिअस तापमानाचादेखील परिणाम होणार नाही.
• हा पूल दोन भागात बांधलेला आहे.
• पुलाचा एक भाग खांबावर आहे तर दुसरा भाग कमानीवर बांधला जात आहे.
• ही कमान तयार आहे.
• या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३२०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
• ते रात्रंदिवस मेहनत करून काम करत आहेत.
• पूल घडवणाऱ्यांसाठी हे एक स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. ते म्हणतात हा पूल तयार झाल्यावर देशाची कीर्ती जगभर पसरले की आम्हाला फळ मिळेल.
या पुलाची कमान आता तयार झाली आहे. तळाची कमान सेट केली गेली आहे. आता ते मजबूत करण्यासाठी काम सुरू आहे. यानंतर, वरची कमान स्थापित केली जाईल. त्याचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होईल. ही कमान तयार करण्यासाठी उच्च प्रतीचे स्टील वापरले गेले आहे. त्यामध्ये जवळजवळ २४ हजार टन स्टिल वापरण्यात आले आहे. तसेच दोन्ही कमानी जोडण्यासाठी २ लाखाहून अधिक बोल्ट बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पुलाचे स्टील हिरव्या रंगाने रंगविला गेला आहे, तो सैन्याच्या वर्दीप्रमाणे दिसत आहे.
विश्वविक्रमी पूल कोणताही धोका झेलण्यास सज्ज
- हा रेल्वे पूल दहशतवादाची समस्या भेडसावणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे.
- त्यामुळे पूल बांधताना सुरक्षा साधने वापरली गेली आहेत.
- या पुलाची देखरेख प्रत्येक स्तरावर केली जात आहे.
- पुलाच्या सभोवताली हाय-डेफिनिशन कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
- कंट्रोल रूमवरुन त्याचे परीक्षण केले जात आहे.
- पुलामध्ये ब्लास्ट प्रूफ आणि माईन प्रूफ स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
- हा भूकंपाच्या तीव्र धक्क्यांसह २६६ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारा सहन करू शकतो.
हा पूल सन २०२१ च्या अखेरीस तयार होईल. २००३-२००४ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले. २०१४ मध्ये केंद्रातील मोदी सरकारने या प्रकल्पाचे काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आणि या वर्षाच्या अखेरपर्यंतचे लक्ष्य निश्चित केले. तो तयार करण्यास डीआरडीओचीही मदत घेण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ: