Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदी व देशभक्तीपर गीतांवर सलग दोन तास भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडवणारा आर्टिस्टिक योगा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विश्वविक्रम

June 21, 2021
in featured, आरोग्य
0
yoga day

मुक्तपीठ टीम

जुन्या हिंदी व देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित योग प्रात्यक्षिके, सलग दोन तास लयबद्ध सादरीकरण करत ‘सूर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’ने विश्वविक्रम प्रस्थापित केला. सर्वाधिक वेळ, जास्तीत जास्त लोकांनी शरीर व मनाच्या सर्वांगीण विकासासाठी तालबद्ध आर्टिस्टिक योगा करण्याचा हा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या (एसएफएसए) वतीने ‘सुर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१’चे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित सलग दोन तास (Longest duration Yoga) विविध आसनांच्या माध्यमातून योग केला गेला. त्यातून भारतीय संस्कृती, कलेचा आणि आरोग्याचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला.

 

yoga day

 

या ‘कलाआरोग्यम् योगाथॉन’ची दखल विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली. ‘सूर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये हे ‘योगाथॉन’ झाले. जवळपास १०० जणांनी यात सहभाग नोंदवला. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरिताबेन राठी यांच्या हस्ते सलग दोन तास उत्कृष्ट योग सादरीकरणासाठी नयना गोडांबे, अभिश्री भोर, मारुती मारेकरी, सुचित्रा नायक, धीरज जबरे, कांचन बलदोटा यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ज्युरी म्हणून आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर, योगपटू खुशी परमार, नुपूर पित्ती यांनी काम पाहिले.

 

yoga day

 

प्रसंगी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, प्रा. अक्षित कुशल, प्रा. किरण राव, प्रा. सुपर्णा भट्टाचार्य आदी उपस्थित होते. योगशिक्षिका सोनाली ससार व प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचलन केले. सायली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील धाडीवाल यांनी आभार मानले.

 

yoga day

 

सरिताबेन राठी म्हणाल्या, “शरीर व मनाच्या तंदुरुस्तीसाठी योग महत्वाचा आहे. योगसाधनेमुळे मनःशांती लाभते. एकाग्रता वाढते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले राहण्यासाठी, तसेच मानसिक ताणतणाव नियंत्रित ठेवण्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. सकारात्मक दृष्टीकोन, आत्मसन्मान, रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित योग व ध्यानधारणा करायला हवी.” शारीरिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता वाढवण्यात योग अतिशय महत्वाचा आहे. नियमित योग आणि पोषक आहार घेतला, तर आपण सर्व प्रकारच्या आजारांना दूर ठेवू शकतो, असे वैद्य हरीश पाटणकर यांनी नमूद केले.

 

yoga day

 

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “योग म्हणजे कलेचा, क्रयशीलतेचा, नावीन्यतेचा, उपक्रमशीलतेचा, सकारात्मक विचारांचा स्रोत आहे. मन आणि शरीराच्या आंतरिक सौंदर्यासाठी योग करणे गरजेचे आहे. शिक्षक-शिक्षकेतर सर्वच कर्मचारी यामध्ये उत्साहाने सहभागी झाले. एकूण १०० लोकांनी सलग दोन तास कलेच्या सादरीकरणातून योग केल्याची विश्वविक्रमी नोंद झाली.”


Tags: International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनएसएफएसएसूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्ससूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमी
Previous Post

सरकारनं पळवाट न काढता पंधरा दिवस अधिवेशन घ्यावे

Next Post

प्राधान्यक्रम ठरवून ग्रामीण आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

Next Post
Hon’ble Cm Sir meeting regarding Gramin arogya vyavstha

प्राधान्यक्रम ठरवून ग्रामीण आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!