मुक्तपीठ टीम
भारत बदलत आहे ते प्रत्येक क्षेत्रात दिसते. आरोग्य क्षेत्रही याला अपवाद नाही. पूर्वी लोक कोणत्याही मोठ्या आजारावर उपचारासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये जात होते. आता तसं नाही. अमेरिकेतून लोक भारतात उपचारासाठी येत आहेत. असाच एक प्रकार नुकताच घडला आहे. बंगळुरू येथील ६७ वर्षीय महिला अमेरिकेतील पोर्टलँड येथून चेन्नईला पोहोचली. ती महिला हृदयाच्या गंभीर समस्येने त्रस्त आहे. एअर अॅम्ब्युलन्सच्या फ्लाइटने अमेरिकेहून भारतात पोहोचण्यासाठी २६ तास लागले. या महिलेच्या मुलांना अमेरिकन उपचाराबाबत शंका होती त्यामुळे १ कोटींहून अधिक खर्च करून त्यांनी आईला भारतात पाठवले.
अलिकडच्या काळात चांगल्या आणि स्वस्त उपचारांमुळे भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. परदेशातून मोठ्या प्रमाणात लोक भारतात उपचारासाठी आले आहेत.
उपचारासाठी आलेली महिला अमेरिकेत मुलांसोबत राहायची
- महिलेला भारतात आणण्यासाठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला.
- त्यात दोन सुपर मिडसाईज जेटचाही समावेश होता.
- आता या महिलेच्या हृदय शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे.
- गेल्या काही वर्षांपासून ही महिला अमेरिकेत मुलांसोबत राहत होती.
- यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा आजार झाला. यानंतर त्यांच्यावर अमेरिकेतच उपचार सुरू झाले.
महिलेच्या कुटुंबाला असे वाटले की अमेरिकेत उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा त्यांच्यासाठी पुरेशा नाहीत. उडत्या आयसीयूमध्ये तीन डॉक्टर आणि दोन पॅरामेडिक्सची टीम होती. ते सतत रुग्णावर लक्ष ठेवून होते. साडेसात तासात त्याला रेकजाविक विमानतळावर आणण्यात आले. विमानात इंधन भरण्यासाठी विमान थांबवण्यात आले. चॅलेंजरने आइसलँडची राजधानी रेकजाविक येथून सहा तासांत इस्तंबूल, तुर्कीपर्यंत उड्डाण केले. येथे वैद्यकीय आणि विमान चालक दल बदलण्यात आले. यामध्ये केवळ बंगळुरूचे जे डॉक्टर अमेरिकेत रुग्णावर देखरेख ठेवण्यासाठी गेले होते त्यांना बदलण्यात आले नाही.
महिलेला दियारबाकीर विमानतळावरून चेन्नईला नेण्यात आले. इमिग्रेशनची औपचारिकता पूर्ण करून महिलेला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.