मुक्तपीठ टीम
अहमदाबादच्या स्टार्टअपने लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करून दोन गावांनी हाय-स्पीड इंटरनेटची व्यवस्था केली आहे. गुजरातच्या अरावल्ली जिल्ह्यातील अक्रुंड आणि नवनगर ही गावे लाय-फाय आधारित इंटरनेटची भारतातील पहिली स्मार्ट गावे बनली आहेत.
लाय-फाय हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. यामध्ये फायबर किंवा उपग्रहाऐवजी लाइट बीम म्हणजेच प्रकाश किरणांनी इंटरनेट सेवा पुरवली जाते.
या दोन गावांमधील शाळा, रुग्णालये, पोस्ट कार्यालये आणि सरकारी कार्यालये सध्याच्या वीज जोडणीमधूनच जलद आणि सुरक्षित इंटरनेट जोडणी मिळवतील. लाय-फाय सिस्टम अल्ट्रा-फास्ट डेटा कनेक्शन प्रदान करतात आणि हे शहरी भागात उपयुक्त आहेत. ग्रामीण भागात फायबर-ऑप्टिक केबल्स किंवा नेटवर्क सहज उपलब्ध नसते.
या दोन गावात लाय-फाय प्रकल्प राबविण्यासाठी कंपनीने २० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. नॅव वायरलेस टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक आणि सीटीओ हार्दिक सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार “नॅव्ह वायरलेसने गुजरात फायबर ग्रिड नेटवर्कची फायबर इंटरनेट कनेक्टिव्हिटी अक्रुंड ग्रामपंचायत इमारतीपासून नवनगर प्राथमिक शाळेपर्यंत वाढविली आहे. जी लाय-फाय वायरलेस ऑप्टिकल कम्युनिकेशनद्वारे १.५ किलोमीटर अंतरावर आहे.”
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील दुर्गम भागात जिथे तंत्रज्ञान नसते तेथे जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या या स्टार्टअपची योजना आहेत.
गुगलने आंध्र प्रदेशातील प्रोजेक्ट एक्स अंतर्गत भारतात लाय-फाय तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे. गूगल हे नवीन लाय-फाय तंत्रज्ञान भारतात सुरू करण्यासाठी एअरटेल, रिलायन्स आणि जिओ यांच्याशी चर्चा करीत आहे. हे तंत्रज्ञान संपूर्ण देशात उपलब्ध होऊ शकते. प्रोजेक्ट एक्सच्या अंतर्गत इंटरनेटची गती लाय-फाय वरून २० गिगाबाईट्स पर्यंत वाढते. सध्याची इंटरनेट गती १ गीगाबाईट्सपुरती मर्यादित आहे.
पाहा व्हिडीओ: