भारतासह अनेक देश कोरोनासारख्या महामारीशी लढत आहेत. लॉकडाउन दरम्यान सतत घरात राहून मुलं चिडचिडी झाली आहेत. अनेक पालक अशा तक्रारी करत आहेत. मुलांसाठी खेळ, व्यायाम, शाळा महत्वाच्या असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले असल्याने त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. त्यामुळे मुलांना सांभाळायचे कसे हे पालकांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
चिडचिडेपणा कमी करण्यासाठी काय कराल?
- मेल्टाडाउन ही एक मानसिक प्रकिया आहे. जेव्हा मुलांना एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटते किंवा असुरक्षितता वाटते तेव्हा मुलं चिडचिडी होतात अशावेळी जोपर्यंत मुलं मिड-फ्रिक आउट स्टेज मधून बाहेर येत नाही तोपर्यंत पालकांनी त्यांच्याशी त्यावर काही बोलू नये.
- जेव्हा मुलं हट्ट किंवा रागराग करतात आणि अचानक शांत होतात त्या स्टेजला मिड-फ्रिक आउट स्टेज असे म्हणतात. ही स्थिती साधारण सर्वच मुलांमध्ये आढळते.
मेल्टाडाउनचे मानसशा्स्त्र
- न्युरो सायंटिस्टच्यामते चिडचिडेपणामागे मेंदूचे दोन भाग सहभागी असतात.
- मेंदूतील एक भाग राग आणि भीती यांसारख्या भावनांवर प्रतिक्रिया देतो.
- मेंदूचा दुसरा भाग शरीरातील ह्रदयाचे ठोके आणि तापमान यांसारख्या क्रिया नियंत्रित करतो.
नेमके काय कराल?
- काही वेळा मुलांच्या वागण्यातून जाणवतं की त्यांच्या मनात कसली तरी भीती निर्माण झाली आहे. अशावेळी मुलांना त्यांना जे हवे आहे ते करु द्यावे नाहीतर ते भीतीने चुकीचे पाउल उचलू शकतात.
- जर तुमचे मुलं अस्वस्थ असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्याआधी स्वत:च्या भावनांना आवर घाला.
- तुमचं मुल रागात असूनदेखील रागाच्याभरात उलटेसुलटे काम करत नसेल तर त्याला थोडावेळ एकटे सोडा. तुम्ही तेथून निघून जा आणि स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वत: शांत राहिलात तर मुलं देखील शांत राहतील.
- जेव्हा तुम्ही मुलांना शांत करत असता त्यावेळी तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीवर लक्ष द्या. लहान मुलांना शब्दांपेक्षा कृतीतून भावना जास्त समजतात. मुलांना सांभाळताना तुमची बोलण्याची पद्धत, तुमच्या चेहऱ्यावरील आणि शारीरिक हावभावांवर लक्ष द्या.
- मुलांची समजूत घालताना त्यांच्यासमोर गुडघ्यांवर बसा, त्यांचे हात हातात घेऊन त्यांच्या डोळ्यात बघून बोला. यामुळे मुलं लवकर शांत होण्याची शक्यता असते.
- मुलं शांत झाल्यावर त्याला काय झाले होते हे शांतपणे विचारा. विशेष म्हणजे ते चुकीचे आहेत याची जाणीव त्यांना होऊ देऊ नका.
- असे केल्यास तुम्ही तुमच्या मुलांशी मिळून मिसळून वागू शकता आणि त्याला समजवू शकता.