Thursday, May 15, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

लोकनेते दि.बा.पाटील जिवंत असताना राजकीय विस्थापित करण्याचा अपमान कोणी केला?

भूमिपुत्रांनो, दि.बा. जिवंत असताना यातना देऊन आता अस्मितेचा आव आणणारे कावेबाज ओळखा!  

June 24, 2021
in featured, Trending, व्हा अभिव्यक्त!
0
patil

रुपेश पाटील / व्हा अभिव्यक्त!

रायगड म्हणजे कुलाबा लोकसभा आणि ह्यात अनेक भूमिपुत्र नेते, कार्यकर्ते निर्माण झाले. पनवेल, उरण नवीमुंबईचा परिसर हा भूमिपुत्रांचा. त्यांच्या जमिनी आणि शेतीचा परिसर. त्यावर वसले मुंबईनंतर नवीन शहर. ते वसविण्याचे काम सिडकोकडे देण्यात आले. सिडकोच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई, पनवेल उरण परिसरातील सुपिक जमिनीवरील पिकती शेती शासनाकडे अतिशय कमी मोबदल्यात हस्तांतरित झाली.

 

उपऱ्यांचे फावले पण भूमिपुत्रांना मात्र चिंचोक्या देऊन उपकाराचा आव आणला गेला. हेच प्रमुख कारण ठरले भूमिपुत्रांच्या उद्रेकाचे. भूमिपुत्रांचा उद्रेक संघटित करून तो तीव्र स्वरुपात सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम केले ते फक्त आणि फक्त दि.बा. पाटील यांनीच. या भूमिपुत्रांना लढ्यासाठी एकत्रित करून न्याय मिळवून देण्याचं श्रेय आहे ते फक्त आणि फक्त दि.बा.पाटील यांचेच!

 

सरकार विरोधात प्रकल्पग्रस्तांना एकवटून जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिडको विकसित भूखंडामध्येही १२.५% टक्के प्रमाणे भूखंड मिळावे ही प्रमुख मागणी सरकाने मान्य केली आणि शेतकऱ्यांचा विजय झाला हा विजय झाला दि बा पाटील यांच्यामुळेच! कायद्याचे शिक्षण. ४ वेळा आमदार. २ वेळा खासदार असलेल्या दि बा पाटील यांनी कारावास पत्करला. लाठीमार सहन केला. त्यांचे खंबीर नेतृत्व आणि भूमिपुत्र ही त्याकाळात एक मोठी ताकद झाली!

 

दि बा पाटीलांच्या एका हाकेला लाखो संख्येने ओ देणारे कार्यकर्ते झाले. ते वर्ष होते १९८४! लढा देशभर गाजला आणि दिबा देशपातळीवर गाजले. त्यांनतर सुरु झाला स्वपक्षीयांचा त्रास. त्यांच्याच शेतकारी कामगार पक्षातील मात्तबर आणि भूमिपुत्र नेते म्हणवणाऱ्या धनदांडदग्यांचा त्रास! त्यामुळेच आज त्यांच्या नावासाठी संघर्ष सुरु असताना ते त्यांनी स्वत:च जोपासलेल्या, वाढवलेल्या शेकापक्षात कार्यरत असतांना त्यांना संघर्ष करावा लागला हे विसरून कसे चालणार?

 

दि.बा.पाटील यांचा शेकापमधून हकालपट्टीने अपमान!

ज्यांच्या लढ्याने, अभ्यासपूर्ण संघर्षाने भूमिपुत्रांना आर्थिक लाभ झाला. हजारो रुपये मिळण्याजोगी शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळाले आणि कोट्यवधी रुपये मुल्याचे साडेबारा टक्क्यांचे भूखंड मिळाले त्याच शांत स्वभावाच्या दिबाना स्वत:ला भूमिपुत्र म्हणवणाऱ्या काहींनी शेकापक्षात त्रास सुरु केला. तो त्रासच नाही तर अपमानही. अपमानाची मालिकाच. तोही इतका टोकाचा की जयंत पाटील, रामशेठ ठाकूर, विवेक पाटील असे दिग्गज भूमिपुत्र नेते असलेल्या शेकापक्षातूनच १९९६साली त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली! टाइप करताना हात थरथरले. हकालपट्टी. तीही दिबांची. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची. ज्याने भूमिपुत्रांना सन्मानानं हक्क मिळवून दिला. शेकापचा आवाज गल्लीतच नाही तर दिल्लीपर्यंत घुमवला. त्याच दिबांची त्यांच्याच शेकापमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यातील एक नाव आज त्यांच्या नावासाठी स्वत:ची धोक्यात आलेली नेतेगिरी चमकवणाऱ्या आमदार प्रशांतशेठ ठाकूर यांचे वडिल रामशेठ ठाकूरांचेही आहे, हे इथं लक्षात घ्या. पुढे कळेलच का दिबांना त्यांच्या हयातीत असं अपमानास्पदरीत्या त्यांच्याच शेकापमधून का हाकलण्याचा प्रमाद केला गेला.

 

दिबा जिवंत असताना भूमिपुत्रांच्या अस्मितेला तेव्हा कोणी दडपले?

काय वाटले असणार आपल्या थोर नेत्याला ? काय भावना असतील त्यांच्या ? कारण काहीही असोत, असतील किंवा ती कारणे बनविली गेली असतील. बनवलीच गेलीत खरं तर. पण इतक्या मोठ्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्याची आपल्याच भूमिपुत्र म्हणवणाऱ्या नेत्यांनी हकालपट्टी करून राजकीयदृष्ट्या विस्थापित करणे, योग्य होते? हे त्यावेळी नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील भूमिपुत्रांनी कसे सहन केले. किंवा दडपून तसे सहन करण्यास त्यांना भाग पाडले गेले. हे आश्चर्यकारक नाही का? काहीतरी प्रतिक्रिया? आंदोलने? जर दिबांवर खरं प्रेम असतं तर ते जिवंत असतानाचा अपमान पाहून दिबांसोबत रामशेठ ठाकूर यांनीही पक्ष सोडायला हवा होता! नाही का? पण तसे काहीच झाले नाही.

 

रामशेठ ठाकूर तेव्हा गप्प का बसले? की…

अहो, दिबा म्हणजे उरण पनवेल नवी मुंबई शेतकऱ्यांची अस्मिता. मग त्यांच्यासोबत अशी वागणूक? रामशेठ ठाकूर यांचे पक्षातील वर्चस्व होते त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांवर काहीतरी दडपण आणले असते, तर दिबांचा असा ते जिवंत असताना अपमान तरी झाला नसता. पण मुरलेले राजकारणी आणि राजकीय सत्तेची महत्वाकांक्षा ज्यांना, त्यांना कुठे अस्मिता आणि कसली भूमिका !

दि बा पाटील यांची हकालपट्टी केल्यानंतर दि बा पाटील यांच्यासोबतचे कार्यकर्ते साहजिकच नाराज झाले. भूमिपुत्र नाराज झाले. मग पुढे?

भूमिपुत्रांनी, स्थानिक नेत्यांनी आपल्या नेत्याला न्याय मिळावा म्हणून शेकापक्ष सोडला असेल? भूमिपुत्रांनी ज्यांच्यामुळे आपल्याला करोडो रुपयांचे भूखंड मिळाले त्या नेत्यासाठी आंदोलने उभारली असतीलच ना? आमच्या नेत्याला सन्माननीय दि बा पाटील याना न्याय देण्याची मागणीसाठी रामशेठ, जयंत पाटील यांना घेराव घातला असणारच ना? नाही हो तसं काही झालं नाही. हजारोंच्या काय लाखोंच्या मनात असेलही पण त्यावेळी चित्र वेगळेच रंगवले गेले. दिबांनाच विस्थापित केले गेले. अडगळीतच टाकण्याचा प्रयत्न झाला. सामान्य भूमिपुत्रांना दडपणारे होते तरी कोण?

 

दिबांच्या हकालपट्टीमुळे रामशेठांना आरामात उमेदवारी

काय होते हो कारण? खरंच दिबांसारख्या महान नेत्याचे काही चुकलेले का? तसे काहीच नसावे. कारण ते शेकापमध्ये असते तर खासदारकीचे तिकीट ते मागतील मागतील त्यांनाच द्यावे लागले असते. त्यामुळे आधीच त्यांची हकालपट्टी घडवली गेली. आणि तिकीट मिळाले श्रीमान रामशेठ ठाकूर यांना ! सध्या दिबांसाठी लढण्याचा आव आणणाऱ्या आमदार प्रशांतशेठ ठाकूरांच्या वडिलांना.

वाह…आपल्या अस्मितेचा सोयीनुसार विसर पडतो की काय माहिती, पण आधारस्तंभ दि बा पाटील याना मिळणारे तिकीट रामशेठ यांनी नाकारले नाही, दि बा पाटील यांच्यासोबत ते पक्षातून बाहेर पडायला हवे होते, पण तसे काही झाले नाही आणि रामशेठ यांनी तिकीट घेतले, निवडणूक लढली !

पॉवर आणि मोठे शेठ नाव यावर ते जिंकले !

 

भाजपा नेते रामशेठ ठाकुरांनी वाजपेयी सरकार एक मताने पाडले!

पण कहर तर पुढे आहे, रामशेठ संसदेत गेले आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नेतृत्व करीत असलेल्या भाजप-शिवसेनाप्रणित एनडीएच्या सरकारला पाठिंब्याची गरज होती त्या रामशेठ यांच्या ‘एका’ मताची मदत ना करता त्या वेळचे भाजपचा पंतप्रधान पाडण्याचे काम श्रीमान रामशेठ ठाकूर यांनी केले. भाजपाचे महान नेते वाजपेयींचे ते सरकार कोसळवून देशावर पुन्हा हजारो कोटींचा खर्च लढणारी निवडणूक रामशेठ ठाकूर यांनी लादली. पण किळस आणणारे राजकारण बघा. आज रामशेठ ठाकूर भाजपचे नेते आहेत, मुलगा भाजप आमदार आहेत. तात्पर्य इथे पण कुठे गेली अस्मिता ?

हा कहर इथेच संपत नाहीय हा रामशेठ साहेबांचा अस्मितेचा.

 

दिबांसारख्या लोकनेत्यांचा अपमानास्पद अंत कोणी घडवला?

आता अत्यंत महत्वाचा आणि लोकनेते, ४ वेळा आमदार, २ वेळा खासदार असलेल्या भूमिपुत्रांच्या नेत्याचा राजकीय अंत करण्याचा अखेरचा अध्याय पाहा. दि बा पाटील यांना, जीवनातील अत्यंत क्लेशदायी वेदना देऊन संपविण्याचा डाव सुरु झाला. अस्मितेला काळिमा फासणारा डाव साधला गेला. पुढचे वाचा, आठवा आणि कोणी ते आपण शोधा!

 

१९९९ला परत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. दि बा पाटील यांनी प्रकल्पग्रतांच्या जोरावर विश्वास ठेवला. अरे इतके लढे दिलेत मी माझ्या शेतकऱ्यांसाठी, मला त्यांच्यासाठी अजून लढायचे आहे. सरकारसोबत भांडून आणखी माझ्या भूमिपुत्रांसाठी हक्क मागायचे आहेत आणि म्हणून त्यांनी १९९९ साली झालेली लोकसभा लढण्याचे ठरविले. पण आड आले कोण? आपले स्वकीय रामशेठ ठाकूरसाहेब! प्रशांतशेठ ठाकूरांचे वडिल.

 

आज दिबांसाठी अस्मितेचा आव आणणारे तेव्हा कसे वागले?

चला आज दिवसरात्र दि बा पाटील यांच्या नावाचे, फोटोचे झेंडे घेऊन नाचणारे हे शेठ त्यावेळी दिबा हयात असताना कसे वागले? आताचा यांचा आव पाहून वाटू शकते की दि बा पाटील लढत आहेत म्हटल्यावर रामशेठ पक्ष सोडून दि बा पाटील यांच्यासोबत गेले असतील. आज आपल्याला अगदी डोळे झाकून वाटू शकते. कारण आता आपण पाहत आहोत रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला लागावे यासाठी आंदोलन होत आहे. पण खरी गरज ज्यावेळी होती, त्यावेळी दिबा जिवंत असताना त्यांना साथ द्यायची, भूमिपुत्रांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा योग्य मान राखण्याची त्यावेळी हे रामशेठ ठाकूर कसे वागले?

 

रामशेठ ठाकूर यांनी दि.बा.पाटील यांना पराभूत केले, बिनविरोध का निवडून दिले नाही?

१९९९मध्ये रामशेठ ठाकूर यांनी दि बा पाटील यांची पर्वा केली नाही. त्यांना मान दिला नाही. त्यांना बिनविरोध लढण्याची संधी दिली नाही. उलट धनबळावर दि.बा.पाटील नावाच्या भूमिपुत्रांच्या नेत्याविरोधात ते शड्डू ठोकून उभे राहिले. निवडणूक लढविण्याची घोषणा केलेल्या दि बा पाटील यांना एकटे पाडले गेले. एकाकी पडलेल्या दि.बा.पाटील यांनी त्यावेळी हात दिला, ते होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी मातोश्री येथे तातडीने शिवसेनेचे तिकीट देऊन दि बा पाटील यांच्या कार्याला सलाम केला. प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना हक्काचा खासदार मिळावा म्हणून शिवसेनच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. मात्र, राम ठाकूर यांनी दि बा पाटील यांच्या विरीधात प्रसार व प्रचार करून पराजित केले ! एक दिग्गज लोकनेता, लढाऊ, प्रकल्पग्रस्थांचे दैवत पराभूत झाले. प्रकल्पग्रस्त शेतकरी लाखो, शेतकारी भूमिपुत्र लाखो. पण  दि बा पाटील यांचा ४३०९७ मतांनी प्रभाव झाला. आपल्याला आपल्याच भूमिपुत्रांनी, ज्यांच्यासाठी लढे उभारले त्यांनीच नाकारले हा धक्का त्यांना सहन झाला नसावा, ते राजकारणातून बाहेर आले. नाराज झाले. आजारी झाले. शिवसेना हाच त्यांचा अखेरचा पक्ष होता. शिवसेना हाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हाचा ध्यास होता. शिवसेनेत आल्यांनतर त्यांनी कोणतेही पक्षांतर केले नाही, हरले, हरविले गेले पण शेतकऱ्यांसाठीचा लढा देत राहिले.

 

शिवसेनाप्रमुखांनी दिबांचा उमेदवारीने मान राखला! अपमान कोणी केला?

आपण अस्मितेच्या गप्पा करतोय, झेंडे नाचवतोय, फेसबुक असो सोशल मीडिया असो, उदंड झाले नेते या अविर्भावात कित्येक भूमिपुत्र दि बा पाटील यांचेच नाव लागले पाहिजे, नाव फक्त दिबांचेच नाही, कुणाच्या बापाचे आरोळ्या ठोकत आहेत. अरे पण आपण आपली दिबा नावाची अस्मिता जिवंत असताना जपली का? का आपण एका महान नेत्याला तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यापासून रोखले? का आपण ते हयात असताना त्यांना विसरलो? का या महान नेत्यावर पराभव लादला? का त्यांना खचविले? का त्यांना आपणच संपविले?

 

दिवंगत होण्याच्या काळात त्यांची परिस्थिती हलाखीची होती, लढवय्या वाघाला एकाकी पाडणारे, संपविणारे आज नावासाठी ओरडत आहेत हे पटते का आणि मनाला विचारा की का आणि कुणी त्यांना तसे राजकीय विस्थापित करून संपवले? आज स्वत:ला विचारा हे पटते? मग ज्यांनी त्यांना जिवंतपणी अपमानास्पद वागवले, राजकीय यातना देत संपवले त्यांच्या डावपेचांना कसे बळी पडता? खरोखरच दि.बा.पाटील नावाच्या लोकनेत्याने केलेल्या उपकारांची जाण असेल तर ते जिवंत असताना त्यांचा अपमान करून त्यांनाच राजकीय विस्थापित करणाऱ्यांच्या कावेबाजीला झुगारुन लावा. दि.बां.च्या आपल्या लोकनेत्याच्या वाईट काळात त्यांना खासदारकीची उमेदवारीचा सन्मान देणाऱ्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाविरोधात जाणीवपूर्वक त्यांचे नाव उभे केले जात आहे. ही कावेबाजी ओळखा. तेही कोण करत आहे, ते ज्यांनी दि.बा. जिवंत असताना त्यांचा अपमान केला. जागे व्हा. खरे शत्रू ओळखा.

 

दिवंगत दि बा पाटील आपल्या कार्याने मोठे झाले आणि बाकी पैशाने आणि राजकारणाने ! पण इतका इतिहास दिल्यावर त्यांच्या वर असलेल्या अस्मितेचा खोटा अविर्भाव आणून त्यांच्या नावाने स्थानिक भाजप नेते आपली राजकीय पोळी भाजत आहेत त्या राजकारणाची कीव येते ! सर्व करा पण आपल्या दिबांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांपासून सावध राहा.

भूमिपूत्र, लोकभावना, दिवंगत दि बा पाटील यांची पुण्याई वापरून राजकीय कारकीर्द मजबूत करणाऱ्या राजकारणाचा अंत काळच करेल लोकभावना आहे !

सध्या एवढेच.

 

(रुपेश पाटील (GDA) हे युवासेनेचे राष्ट्रीय सहसचिव, राज्य विस्तारक आहेत)

संपर्क ९८२०७०७३०३ ट्विटर : @rupeshpatil03


Tags: @rupeshpatil03BJPnavi mumbaiShivsenaदि.बा. पाटीलरामशेठ ठाकूररुपेश पाटीलसिडको
Previous Post

नवी विमानतळाला दिबांचेच नाव, भूमिपुत्रांच्या आंदोलनाला ‘आप’चा पाठिंबा

Next Post

पुण्यातील आंबिल ओढ्यातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती

Next Post
neelam & shinde

पुण्यातील आंबिल ओढ्यातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!