मुक्तपीठ टीम
अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर देशासह राज्यातल्या पाऊस, पाणी, कृषीक्षेत्र, राजकीय, सामाजिक विषयांवर भेंडवळची भविष्यवाणी होत असते. ही भविष्यवाणी नेमकी कशी वर्तवतात, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न:
यावर्षी कशी झाली भविष्यवाणी?
- २०२० प्रमाणेच याही वर्षी कोरोना महामारीमुळे चार व्यक्तीमध्ये मांडणी केली गेली.
- अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भाकित वर्तवण्यात येते, त्यानुसार आज सकाळी झाले आहे.
भेंडवळ भविष्यवाणीची परंपरा
• भेंडवळ हे गाव बुलढाणा जिल्ह्यात आहे.
• या भविष्यवाणीला साडे तीन शतकांची परंपरा आहे.
• चंद्रभान वाघ यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या मांडणीला सुरुवात केली होती.
• ही मांडणी अक्षयतृतीयेला करण्यात येते.
• दुसऱ्या दिवशी सकाळी या मांडणीचे भाकीत उघडले जाते.
भेंडवळच्या भविष्यवाणीची अशी होते मांडणी
• शेताच्या मधोमध दीड बाय दोन फुटाचा खड्डा तयार करण्यात येतो.
• त्या खड्ड्यात चार काळ्या मातीचे ढेकूळ ठेवून त्यावर पाण्याची घागर ठेवण्यात येते.
• घागरीवर कुरडई, करंजी, पुरी, भजा, वडा, पापड इत्यादी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात.
• खड्डयात खाली पान-विडा ठेवण्यात येतो.
• खड्ड्याच्या समान अंतरावर केलेल्या जागेत अंबाडी, मूग, उडीद, साळी, जवस, लाख, वटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर ही धान्य थोड्या प्रमाणात ठेवण्यात येतात.
• त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पुंजाजी महाराज वाघ, चंद्रभान महाराज वाघ व अन्य दोन व्यक्ती त्यांच्या अनुभवानुसार निरीक्षण करतात व त्यानुसार भाकीत सांगण्यात येते.
मागील वर्षाचे असे होते भाकीत
• मागील वर्षी कुलदैवतचा कोप सांगितला होता.
• भादलीचा दाणा (धान्य) हा बाहेर गेला होता ते रोगराईचे प्रतीक आहे.
• त्यामुळे साथीचा रोग अद्यापही बंद न होता सुरूच आहे.
• घागरीमघ्ये पाणी अधिक होते त्यामुळे जलाशये, धरण, कालवे भरलेले राहीले त्यामुळे पाणी टंचाई जाणवणार नाही असे भाकीत सांगण्यात आले होते.