मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात बर्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत असतात. या वेळी त्यांनी एका आजारावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी वैद्यकीय शास्त्राचे कौतूकही केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, वैद्यकीय शास्त्राच्या जगाने संशोधन आणि कल्पकतेसोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने खूप प्रगती केली आहे. पण काही आजार हे आजही आपल्यासाठी मोठे आव्हान आहे. असा एक रोग आहे – मस्क्यूलर डिस्ट्रॉफी. त्यांनी मस्क्यूलर डिस्ट्रॉफी नावाच्या अनुवांशिक आजारावर चर्चा केली. कार्यक्रमात त्यांनी हिमाचल प्रदेशच्या मानव मंदिर नावाच्या आरोग्य क्लिनिकच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. या आजाराबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेवूया…
काय आहे मस्कुलर डिस्ट्रॉफी आजार?
- मस्कुलर डिस्ट्रॉफी हा एक अनुवांशिक रोग आहे.
- हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.
- यामध्ये शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात.
- या स्थितीत, रुग्णाला जीवनातील सामान्य हालचाल करणे कठीण होते.
- ठराविक चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळ्या वयोगटात आणि स्नायूंच्या डिस्ट्रोफीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या स्नायूंच्या गटांमध्ये सुरू होतात.
- मस्क्यूलर डिस्ट्रॉफीचे अनेक प्रकार आहेत.
- सर्वात सामान्य प्रकारची लक्षणे बालपणापासून सुरू होतात.
- प्रौढ होईपर्यंत त्याची लक्षणे तीव्र होण्याचा धोका असतो.
- मस्क्युलर डिस्ट्रोफीमुळे, वारंवार पडणे, झोपल्यानंतर किंवा बसल्यानंतर उठण्यास त्रास होणे, अस्थिर चालणे, स्नायू दुखणे इत्यादी होऊ शकतात.
- मस्क्यूलर डिस्ट्रोफीवर सध्या कोणताही इलाज नाही.
- औषधे आणि इतर उपचार लक्षणे कमी करण्यात मदत करू शकतात.
मस्क्यूलर डिस्ट्रॉफी का होतो? त्या मागे कारण काय?
- काही जीन्स मस्क्यूलर डिस्ट्रोफीच्या समस्येचे मुख्य कारण म्हणून ओळखले जातात.
- ते स्नायू तंतूंचे संरक्षण करतात.
- कोणत्याही जीन्समधील दोषांमुळे मस्क्यूलर डिस्ट्रोफीचा धोका होऊ शकतो.
- इतर काही परिस्थितींमुळे मस्क्यूलर डिस्ट्रोफीचा धोका वाढू शकतो.
- ज्या लोकांचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना कालांतराने तो विकसित होण्याचा धोका असू शकतो.
मस्क्यूलर डिस्ट्रॉफीचा उपचार कसा केला जातो?
- अनुवांशिक चाचण्या, एन्झाइम चाचण्या आणि स्नायू बायोप्सीच्या मदतीने स्थितीचे अचूक निदान केले जाऊ शकते.
- एकदा मस्क्यूलर डिस्ट्रॉफीचे निदान झाल्यानंतर, सपोर्टिव्ह थेरपी रोगाची लक्षणे आणि तीव्रता कमी करण्यास मदत करते.
- फुफ्फुस आणि हृदयरोग तज्ञांकडून उपचार घ्या.
- औषधे आणि थेरपीद्वारे स्थिती नियंत्रित करून त्याचे गंभीर धोके टाळता येतील.