Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: किती झालं कामकाज? किती आणि कोणती विधेयकं संमत?

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन

March 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जास्त गाजले ते राजकीय गदारोळामुळे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेले दोन स्टिंग बॉम्ब हादरे देणारे ठरले. तसंच अधिवेशनातील सर्वच आरोपांच्या फैरींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवशी दिलेलं रोखठोक प्रत्युत्तरही चर्चेचा विषय ठरलं. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खमकेपणाने मांडलेली भूमिकाही गाजली. या सर्व राजकीय गदारोळात अधिवेशनात झालेल्या कामकाजाकडे जास्त लक्ष गेलं नाही. अधिवेशनात नेमकं किती कामकाज झालं, किती आणि कोणती विधेयकं संमत झाली त्याची माहिती जाणून घेणं महत्वपूर्ण आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाची माहिती

दोन्ही सभागृहात १७ विधेयके संमत

  • नगर विकास विभाग – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रभागांची पुनर्रचना अधिकार राज्य शासनाकडे घेणे (मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा,नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२)
  • ग्राम विकास विभाग – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक विभागांची व निर्वाचन गणांची आणि पंचायती प्रभागांची पुनर्रचना अधिकार राज्य शासनाकडे घेणे (महाराष्ट्र ग्रामपंचायती आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायती समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२)
  • वित्त विभाग – महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२.
  • उद्योग ऊर्जा व कामगार विभाग – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये कलम ३६ नंतर कलम ३६ (अ) समाविष्ट करण्याचे व सदरहू सुधारणा १० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना लागू करण्यासाठी कलम-(१) मध्ये त्याबाबतची तरतूद करण्याचे तसेच सदर अधिनियमातील कलम १७ (छ) मधील आधार कार्ड क्रमांकाबाबतची तरतुद वगळण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२.
  • नगर विकास विभाग – बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४६.४५ चौ.मीटर (५००चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत. (सन २०२२ चा महा. अध्या. क्र .१ चे रुपांतरीत विधेयक) (मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे ) झाडान्चे सरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, २०२२ )
  • नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत (सन २०२२ चा महा. अध्या. क्र. २ चे रुपांतरीत विधेयक) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२
  • सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग – ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने युनियन ऑफ इंडिया विरुध्द राजेंद्र शहा व इतर या केसमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सहकारी संस्थांच्या सदस्यांच्या हितार्थ आणि सहकार चळवळीच्या सुरळीत कामकाजाकरीता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये कलम २५अ, २६, ७३अ, ७३कअ, ७५, ७८, ७८अ, ७९, ८२, १०९, १४४-५अ, १५७. महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२१
  • वित्त विभाग – महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2022.
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग – निकमार विद्यापीठ, पुणे विधेयक, २०२२ (स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत)
  • वित्त विभाग – महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२२
  • मराठी भाषा विभाग – महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण (राजभाषा) विधेयक, २०२२
  • महसूल विभाग – महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२२.
  • गृह विभाग – गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे. महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, २०२२
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग – नविन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यास अंतिम मान्यता देण्याचा व अनुपालन अहवाल पाठविण्याचा दिनांक वाढविणे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२.
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग – महाराष्ट्र सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठ विधेयक, २०२२
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग – पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे विधेयक, २०२२

 

विधानपरिषदेचे कामकाज

सभागृहात १५ बैठका पार पडल्या.प्रत्यक्षात ८८ तास ३७ मिनिटे कामकाज पार पडले. रोजचे सरासरी कामकाज ५ तास ५३ मिनिटे पार पडले. एकूण १७५५ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यापैकी ७७५ प्रश्न स्विकृत होते.११३ तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. अतारांकित प्रश्न १२२ उपस्थित करण्यात आले.अल्पसूचना ५ प्राप्त झाल्या. नियम ९३ अन्वये एकूण ८० सूचना करण्यात आल्या. सभागृहाच्या पटलावर एकूण १९ निवदने ठेवण्यात आली. औचित्याचे एकूण १०६ मुद्दे उपस्थित करण्यात आले.विशेष उल्लेख २५४ प्राप्त सूचना होत्या. नियम ४६ अन्वये २ निवेदने होती.

 

शासकीय विधेयके

विधानपरिषद विधेयक पुर:स्थापिक २, यामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके २, विधानसभा विधेयकामध्ये पारित करण्यात आलेली विधेयके ११ होते, विधानसभेकडे शिफारशीशवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके ४ होती.नियम २६० अन्वये एकूण ४ प्रस्ताव प्राप्त होते.अशासकीय ठराव ११०,अंतिम आठवडा प्रस्तावाची संख्या १ होती. सदस्यांची अधिवेशनाला ९२.८५ टक्के उपस्थिती होती. एकूण सरासरी उपस्थिती ८५.७१ टक्के होती.

 

विधानसभा कामकाज

एकूण १५ बैठका पार पडल्या असून या काळात सभागृहाचे रोज सरासरी कामकाज ७ तास १० मिनिटे चालले. एकूण ६६९८ इतके प्रश्न तारांकित प्राप्त होते. त्यापैकी ६९६ प्रश्न स्वीकृत असलेल्या प्रश्नांपैकी सभागृहात ६४ प्रश्न उपस्थित करण्यात आले. ३ अल्पसूचना प्राप्त होत्या. एकूण १७८७ लक्षवेधी सूचना प्राप्त होत्या. त्यापैकी स्विकृत २७४ होत्या. यामध्ये८० लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाल्या. नियम ९७ च्या एकूण ६८ सूचना प्राप्त होत्या.

 

शासकीय विधेयके

विधानसभा विधेयक पुर:स्थापिक १३, यामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके १५, विधानपरिषद विधेयकामध्ये संमत करण्यात आलेली विधेयके १ होते, नियम २९३ अन्वये एक सूचना प्राप्त होती, त्यावरती चर्चा पार पडली. प्रश्न- उत्तरातून ७३ सूचना प्राप्त होत्या. यामध्ये ६३ सूचना स्विकृत होत्या, त्यापैकी ६ विषयांवर चर्चा झाली. सदस्यांची अधिवेशनाला ९१.५३ टक्के उपस्थिती होती.एकूण सरासरी उपस्थिती ८४.३८ टक्के होती.

 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत

विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित होत असल्याचे सांगत पुढील अधिवेशन सोमवार, १८ जुलैपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा केली आहे.


Tags: chief minister uddhav thackeraydevendra fadanvisLegislative Budget Sessionmaharashtra lesgislative budget sessionmuktpeethmumbaiRainy Sessionपावसाळी अधिवेशनमुक्तपीठमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईविधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Previous Post

“न्यायाचा तराजू हा चोरबाजारातून आणलेला!” संजय राऊतांचं रोखठोक प्रत्त्युतर!

Next Post

मराठीत्व, हिंदुत्व ते निवडणुकीतील मोदीत्व! फडणवीसांचं प्रत्येक मुद्द्यावरील ठाकरेंना उत्तर शिवसेना-भाजपा नातं कायमचं संपल्याचं दाखवणारे?

Next Post
Fadanvis vs Thackeray

मराठीत्व, हिंदुत्व ते निवडणुकीतील मोदीत्व! फडणवीसांचं प्रत्येक मुद्द्यावरील ठाकरेंना उत्तर शिवसेना-भाजपा नातं कायमचं संपल्याचं दाखवणारे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!