मुक्तपीठ टीम
वर्ध्यातील हर्षल लांबट हा शेतकरी ‘युवा किसान चॅम्पियन’चा मानकरी ठरला आहे. महिंद्रा समुहाने सुरु केलेल्या कृष-ई पुरस्कारांचा हर्षल पहिल्या मानकऱ्यांपैकी एक आहे. त्याने वर्ध्यातील आपल्या शेतात महिंद्राच्या सहकार्याने केलेले प्रयोग आर्थिक फायद्याचे ठरलेतच, पण आता त्याला राष्ट्रीय पातळीवरील सन्मान मिळवून देणारेही ठरले.
महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर’ हा भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर निर्माता आणि १९.४ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहाचा एक भाग आहे. महिंद्रा उद्योगसमुहाने ‘कृष-ई चॅम्पियन’ पुरस्कार विजेत्यांची नावेही घोषित केली. ‘महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अॅवॉर्ड्स’ची परंपरा पुढे नेत, ‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ यंदा सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील हर्षल लांबट यांना युवा किसान चॅम्पियनने गौरवण्यात आले.
नवीन तंत्राचा अवलंब करून हर्षल लांबट यांच्या शेतातील उत्पादनात व त्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली. यावर्षी हर्षल लांबट यांनी खरीप हंगामात त्यांच्या शेतात कापसाची ८ एकर आणि सोयाबीनची ४ एकर लागवड केली. त्यांनी त्यांच्या शेतात नवीन तंत्राचा वापर केला. याची सुरूवात त्यांनी कृषी टीमसोबत महिन्याच्या शेवटी केली. कृषी टीमसोबत झालेल्या चर्चेननुसार, १ एकरच्या प्लॉटवर कृषी टीमने सांगितलेल्या पीक पद्धतीचा वापर केला. वेगवेगळ्या कृषी सहाय्यकांची शेतात व्हिजीट होत होती. त्यांचे मार्गदर्शन फोनवर आणि व्हिडीओ कॉलवर मिळाले. यावर्षी त्यांच्या शेतामध्ये १२ क्विंटल उत्पन्न आले.
‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ वितरण सोहळा वर्षातून दोनदा, खरीप व रब्बी हंगामांच्या काळात, आयोजित केला जाणार आहे. सामान्यतेतून असामान्य कामगिरी करणाऱ्या, कोणतीही मर्यादा न स्वीकारता नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करीत, कृषी क्षेत्रात सकारात्मक कामगिरी करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना वैयक्तिकरित्या व संस्थांनाही या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ २०२०च्या प्रादेशिक फेरीत भारताच्या २९ ‘कृष-ई’ केंद्रांमधील शेतकर्यांनी भाग घेतला. राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या या प्रादेशिक पुरस्कार विजेत्यांना चार विभागांमध्ये सन्मानित करण्यात आले. ‘तंत्रज्ञान चॅम्पियन’, ‘महिला किसान चॅम्पियन’, ‘युवा किसान चॅम्पियन’ आणि ‘रेंटल पार्टनर चॅम्पियन’ असे या पुरस्काराचे विभाग आहेत. या पहिल्याच वर्षी राष्ट्रीय स्तरावर १० जणांपैकी महाराष्ट्रातील हर्षल लांबट यांना युवा किसान चॅम्पियन अॅवॉर्ड देण्यात आला.
‘महिंद्रा’च्या अनेक वितरकांकडे ‘कृष-ई’ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यायोगे वैज्ञानिक पद्धती, माती परीक्षण सुविधा, प्रात्यक्षिक सुरू असलेले प्लॉट्स, उपकरणे भाड्याने देण्याची सोय, ‘प्रीसिजन फार्मिंग’चे सोल्युशन्स, बियाणे व रसायनांसारख्या पीक-साधनांची विक्री, ठिबक सिंचन उपकरणे, तसेच ट्रॅक्टर, कापणीची यंत्रे व इतर कृषी यंत्रांची विक्री व दुरुस्ती यांसारख्या सुलभ सेवा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.
पाहा व्हिडीओ: