मुक्तपीठ टीम
नेहमीच जेवल्यानंतर चालणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, असे सांगितले जाते. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार आपण जेवल्यानंतर १० ते ३० मिनिटांपर्यंत चालले पाहिजे. यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. तसेच कर्करोगासारख्या इतर काही रोगांचा धोकाही कमी होतो.
जेवल्यानंतर चालणे का महत्वाचे आहे ते जाणून घ्या:-
पचनक्रिया चांगली होते-
- जेवल्यानंतर चालल्याने अन्नाचे पचन चांगले होते.
- जेव्हा शरीराची हालचाल होते,तेव्हा अन्नाची हालचाल जलद होत असते, याचा परिणाम हा पचनक्रियेवर होत असतो.
- याशिवाय अल्सर, छातीत जळजळ आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
रक्तातील साखर नियंत्रणात
- जेवल्यानंतर शरीराची हालचाल झाल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका कमी असतो.
- २०१६ मध्ये एका संशोधनानुसार जेवणानंतर दहा मिनिटे चालण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात येते.
हृदयरोगाचा धोका कमी होतो-
- शारिरीक हालचाली हृदयासाठी फायदेशीर ठरल्या आहेत. हे देखील संशोधनात सिद्ध झाले आहे.
- अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, जेवल्यानंतर १० मिनिट चालणे, हे हृदय सुरक्षित ठेवू शकते.
वजन वाढत नाही-
- जेवणानंतर चालण्यामुळे कॅलरी बर्न होतात.
- जर आपण नियमित चालत असाल तर वजन वाढण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होईल.
- परंतु, हे लक्षात ठेवा की आपण दररोज जास्त तेल आणि मसालेवाले पदार्थ खाणे टाळावे.
रक्तदाब वाढत नाही-
- वाढीव रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी १० मिनिट चालावे.
- चालताना हे लक्षात ठेवा की वेगाने चालू नये.