Thursday, May 15, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home व्हा अभिव्यक्त!

#व्हाअभिव्यक्त “नवनिर्मितीस वाव नाही, मग साहित्य संमेलनास अर्थ काय?”

February 21, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
marathi sahitya-1

महेश माने उर्फ सुधाकरसुत

 

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६,२७,२८तारखेला आहे हे वाचून आनंद आणि दुःख ह्या दोन्ही भावना मनात उचंबळल्या. मला आठवली वि .स. खांडेकरांच्या ‘अमृतवेल’ कादंबरी. त्याचा संदर्भ असा आहे “माणसाच्या जीवनातील स्वप्नांचा चक्का – चुराडा झाला तरी त्या रक्ताने माखलेल्या पायांनी नवीन स्वप्नांकडे जाण्याची आशा त्याला असते.म्हणून माणसाच्या जीवनाला अर्थ येतो तो ह्यामुळेच”

 

लेखक म्हणजे काय? तर आपल्या लेखातून केलेले नवनिर्माण!! खास करून मी लेखकांविषयी बोलेन. भाषेचं सामर्थ्य हे तिच्या मांडणीवर, अभिव्यक्तीसाठी केलेल्या उपयोगावर ठरते. मनात भावना असतात. माहिती असते. काही निरीक्षणे असतात. ती दुसऱ्यांसमोर मांडणे त्यासाठीचा एक संवादप्रकार म्हणजे लेखन. त्यासाठी लेखक कवी हे साहित्यिक वेगवेगळे प्रकार साहित्य प्रकार निवडतात. कथा ,कादंबरी ,काव्यरचना प्रवासवर्णन, नाटक इत्यादी. तो भाषेचा समृद्ध वर्षानुवर्ष आलेला ठेवा असतो.

 

कित्येक पुस्तकं वाचून व्यक्तीचं जीवन बदलतं. “वाचेल तो वाचेल” ह्यातील पहिल्या वाचेल शब्दाचा अर्थ दुसऱ्या वाचेल ह्या शब्दाच्या वेगळा आहे. नाही का? भाषा आपल्या मनातील भाव प्रकट करते म्हणून लेखकांना समाजात प्रतिष्ठा आहे. पण दुर्दैवानं फक्त प्रसिद्ध लेखकांचे मत मांडण्यास व्यासपीठ उपलब्ध आहेत. नवलेखकांना कोणी विचारतही नाही.त्यांच्या समस्या कोठेही मांडल्या जात नाहीत. लेखनासाठी जीवन त्यागणाऱ्या व्यक्तीही आपणास दिसत नाही. कारण त्यांना कोणीही प्रकाशझोतात आणत नाही. त्यांना कोणीही आपलं मत मांडण्याचा अधिकार देत नाही.

 

नम्रपणे सांगायचं झालं तर संमेलनाचे अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर आहेत. त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे. विज्ञान आणि भाषा साहित्य ह्यांचा ते सुरेख मेळ नक्कीच घालतील, ही आशा मनात आहे.

 

आता साहित्य संमेलनाविषयी बोलायचं झालं तर त्याला वादाची परंपरा कायम आहे. मला वाटतं ती परंपरा असावी. जसं की, घर्षणातून ठिणगी पडून ज्योत निर्माण होईल अशी. पण तसे होत नाही. फक्त प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा यांसाठीच वाद होतात. त्यात नवं साहित्याचं नवं रोप होरपळून जळून जाते. कधी असा विचार – विनिमय झाला आहे का? नवलेखकांना मुख्य व्यासपिठावर बोलण्याची संधी देऊ. त्यांचं मत ऐकून घेऊ. कारण भाषा साहित्याचा प्रवाह अविरतपणे पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीची आहे. पण असे वाद होत नाहीत. होतात ते ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही.

 

भाषा साहित्याचा प्रवाह अखंड सुरू राहील का? राहील काही मोजक्या लोकांच्या हाती. अगदी घराणेशाही सारखं! साहित्यामुळे होईल असं म्हणायला जड वाटतं!! आताचं ज्वलंत उदाहरण घेऊ. माझे काका खूप छान पत्र लिहीत असत. इतकी छान की लोक पत्र जपून ठेवत. असं माझे वडील सांगत. नंतर त्यांनी कादंबरी लिहायला घेतली. पण त्यांच्या लिखाणातून ते लेखक होऊच शकले नाही. कारण प्रकाशक कितीही छान लिहाले तरी घेत नाहीत. कारण नव्या लेखकांचं नाव प्रसिद्ध नसतं. पुस्तकं जो प्रसिद्ध आहे त्याचीच खपतात. त्यांना लिखाणाशी इतकं देणंघेणं नसतं. पण त्यामुळे नवे प्रकाशझोतात येत नाहीत

 

महाराष्ट्र सरकार साहित्य संमेलनाला ५० लाख देणार आहे त्यातील लाखो रुपये समारंभ गुच्छ आणि फुलांनी सुशोभीकरणात जातील. दोन चार दिवसांनी त्याचं रूपांतर कचऱ्यात होईल. त्यातून मराठी भाषेचे नेमके काय भले होणार?

 

माझा स्वत:चा अनुभव सांगतो. ‘निसर्ग आणि स्पंदनिय हृदय’ या संकल्पनेवर तसेच “भूतकाळातील साहित्य ठेवा आणि वर्तमानकाळातील साहित्य ठेवा” या विषयी नवीन लेखकांचं काय मत असायला हवे आणि भाषा साहित्य कसं समृद्ध करता येईल? याविषयी मला व्यासपिठावर बोलायचे होते पण कोणीही बोलू दिलं नाही.

 

जेथे नवलेखकांना आपलं मत मांडण्यासाठी व्यासपिठावर वाव मिळत नाही. अशा संमेलनासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पण त्यातून नवलेखक प्रकाशझोतात येत नाही. घडत नाहीच. मग त्यातून निष्पन्न काय होतं? साहित्य संमेलन हे प्रसिद्ध लेखक – कवी यांनी एकत्र येऊन, मिरवण्याची हौस भागवत लोकांचं केलेलं मनोरंजन इतकचं. भाषा साहित्याची नवनिर्मिती अशी काहीही होताना दिसत नाही. मग ह्या साहित्य संमेलनाचा अर्थ काय? माझ्याकडे तरी याचे उत्तर नाही.

mahesh mane

महेश माने उर्फ सुधाकरसुत
लेखक- निसर्ग आणि स्पंदनीय हृदय


Tags: akhil bhartiy marathi sahity sammelanmahesh mane sudhakarsutsahitya sammelanअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहेश माने सुधाकरसुतसाहित्य संमेलन
Previous Post

कोरोना वाढतोय…लोकल प्रवासात कशी काळजी घ्याल? वाचा डॉक्टरांचा सल्ला…

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – रविवार – २१ फेब्रुवारी २०२१ • आज २,४१७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,९४,९४७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे. • आज राज्यात ६,९७१ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज रोजी एकूण ५२,९५६ सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आज ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,२०,२५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,००,८८४ (१३.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,४२,५६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • मुंबई हजाराकडे, अमरावती, पुणे, नागपूर सुपर हॉटस्पॉट • २१ ठिकाणी रुग्णसंख्या शंभरीपार • मुंबई मनपा ९२१ • अमरावती मनपा ६६६ • पुणे मनपा ६४० • नागपूर मनपा ५९९ • पिंपरी चिंचवड मनपा २९१ • नाशिक मनपा २९१ • अमरावती २६० • पुणे २४१ • बुलढाणा २१६ • ठाणे मनपा १७७ • नागपूर १६० • जळगाव मनपा १५५ • कल्याण डोंबवली मनपा १५० • अकोला मनपा १४५ • वाशिम १२६ • वर्धा १२४ • नवी मुंबई मनपा १२३ • जळगाव १२१ • अहमदनगर १०३ • औरंगाबाद मनपा १०३ • नांदेड मनपा १०३ • यवतमाळ ९६

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – रविवार – २१ फेब्रुवारी २०२१ • आज २,४१७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,९४,९४७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे. • आज राज्यात ६,९७१ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज रोजी एकूण ५२,९५६ सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आज ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,२०,२५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,००,८८४ (१३.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,४२,५६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • मुंबई हजाराकडे, अमरावती, पुणे, नागपूर सुपर हॉटस्पॉट • २१ ठिकाणी रुग्णसंख्या शंभरीपार • मुंबई मनपा ९२१ • अमरावती मनपा ६६६ • पुणे मनपा ६४० • नागपूर मनपा ५९९ • पिंपरी चिंचवड मनपा २९१ • नाशिक मनपा २९१ • अमरावती २६० • पुणे २४१ • बुलढाणा २१६ • ठाणे मनपा १७७ • नागपूर १६० • जळगाव मनपा १५५ • कल्याण डोंबवली मनपा १५० • अकोला मनपा १४५ • वाशिम १२६ • वर्धा १२४ • नवी मुंबई मनपा १२३ • जळगाव १२१ • अहमदनगर १०३ • औरंगाबाद मनपा १०३ • नांदेड मनपा १०३ • यवतमाळ ९६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!