दिलीप नारायणराव डाळीमकर
राजा जेंव्हा राजधानी भोवती ताराचे कुंपण, रस्त्यावर खिळे ,मोठे मोठे बॅरॅकेटस,रस्त्यांवर उंच भिंती बांधत असेल तर असल्या तटबंदीचा अर्थ काय घ्यायचा?
पहिला अर्थ असा निघतो की राजा घाबरला आहे. राजाच्या अंगी परिस्थिती हाताळण्याचे कसब नाही किंवा राजा परिस्थिती हाताळण्यासाठी अकार्यक्षम आहे.
दुसरा अर्थ याचा असा निघतो की राजा गरीब प्रजेलाच आपला दुष्मन शत्रू समजत आहे.प्रजा आपल्या राजदरबारात येऊ नये यासाठी राजाची धडपड.
राजाला आपल्या प्रजेची एवढी भीती का वाटावी.कारण राजाला आपल्या कर्तृत्वात खोट आहे याची जाणीव मनोमनी झाली असावी.काही जहागिरदारला (आजच्या काळातिल उद्योगपती) हाताशी धरून गरीब जनतेचे शोषण करण्याचा राजाचा मनसुबा प्रजेने ओळखला.या अन्यायाविरुद्ध प्रजा पेटून उठली व राजदरबारी जाऊन आपले न्याय हक्क मिळवावे यांसाठी प्रजा लढू लागली.
प्रजेने अहिंसक व लोकशाहीमार्गाने उभारलेल्या लढ्यामुळे आपलं पितळ उघडे पडेल या भीतीने राजा प्रजेला सामोरे जाण्यास घाबरत आहे.राजाने साम दाम दंड भेद नीती अवलंबली पण हुशार प्रजेने याचा मुकाबला अहिंसक मार्गाने केला.प्रजेला बदनाम करण्याचा प्रयत्न राजाने केला पण तोही प्रयत्न प्रजेने हाणून पाडला.
आता स्वतःची कातडी वाचविण्यासाठी व स्वतःची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राजा तटबंदी करून राजदरबारात जुलमी जहागीरदाराच्या दबावाखाली कारभार करत आहे.
शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन