मुक्तपीठ टीम
आज मुंबईभर युवासेनेची महागाईविरोधात निदर्शने सुरु आहेत. थाळ्या वाजवत महागाईविरोधात निदर्शनं करतानाच अपरिहार्यपणे मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाचाही समाचार घेण्यात आला. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज ठाकरेंचा २००४ पासून २०२२ पर्यंतच्या बदलत्या भूमिकांच्या भाषणांचा दाखला देत त्यांच्यावर टीका केली. तसेच कालच्या भाषणात जनतेला सर्वात जास्त त्रस्त करणारा महागाईचा मुद्दाच नव्हता. त्यामुळे सर्वांना कळले की, कालच्या भाषणाचे स्क्रिप्ट कोणत्या पक्षाने दिले होते!
थाळ्या वाजवा, महागाई पळवा!
- बस हो गई महागाई की मार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत जे सत्तेवर आले त्यांच्याच राज्यात महागाई भडकली.
- पेट्रोलचे दर ७० रुपये असताना जे निदर्शने करत होती, ती लोक गेली कुठे?
- कोरोनाविरोधात मोदी साहेबांनी कोरोनाला पळवून लावलं होतं, आता आम्हीही थाळ्या वाजवून महागाईला पळवून लावायला सांगत आहोत.
- आता आम्हाला अपेक्षा आहे की भाजपाही शरमेनं थाळ्या वाजवून महागाईला पळवून लावेल!
- २०१५, २०१८, २०२२ या तीन वर्षातील डिझेलचे दर पाहिले तर कळते की ते दुप्पट झाले.
- ज्या घोषणांवर, ज्या आश्वासनांवर भाजपाला मते दिली, कुठे गेली ती आश्वासने?
- आता त्यांच्याच आदेशाप्रमाणे थाळ्या वाजवल्यानंतर तरी महागाईला ते पळवून लावतील, अशी आशा आहे!
- आम्ही केलेलं महागाईविरोधातील आंदोलन जनताच आता हाती घेईल.
राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका दिलेल्या स्क्रिप्टनुसार!
- कालचं भाषण ऐकून जनतेला थ्री इडियट्सचा डायलॉग आठवला असेल, अरे भाई कहना क्या चाहते हो?
- २००४मध्ये शिवसेना चांगली – भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट
- २००९मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी चांगली, शिवसेना-भाजपा वाईट
- २०१४ भाजपा चांगली, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी वाईट
- २०१९ – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस चांगली, शिवसेना-भाजपा वाईट
- २०२२ – आताच्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्तेही संभ्रमात! नेमकी भूमिका आहे तरी काय?
- गेल्या काही वर्षात जनतेला कळलेले आहे, वेगवेगळ्या पक्षांनी स्क्रिप्ट द्यायच्या, या पक्षाने त्या वाचून दाखवायच्या!
- आजचा सर्वात मोठा प्रश्न हा महागाईचा आहे. जनतेला स्वातंत्र्यानंतरची सर्वात जास्त महागाईला तोंड द्यावं लागत आहे.
- व्याजदर कमी झाले आहेत. बचत संपतेय. पण कालच्या भाषणात महागाईचा मुद्दाच नव्हता. त्यामुळे सर्वांना कळले की, कालच्या भाषणाचे स्क्रिप्ट कोणत्या पक्षाने दिले होते!