Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

October 15, 2022
in घडलं-बिघडलं
0
Marathi Language Minister Deepak Kesarkar

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राला थोर संत, विचारवंत, प्रबोधनकार, सामाजिक शास्त्रज्ञ  यांची  परंपरा लाभलेली आहे. यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला आहे.’पुस्तकांचे गाव’ या सारखे उत्तम उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. समृध्द मराठी भाषेचे  महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे  मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात  आज ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते, अभिवाचनाच्या कट्ट्याचे उद्घाटन मंत्री केसरकर यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाषा संचालक विजया डोनीकर, भाषासंवर्धक ग्रंथसखा  श्यामसुंदर जोशी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, साहित्याची आवड ही वाचनातूनच होत असते. त्यामुळे शाळांमध्ये वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.जे लोक वाचन करतात त्यांनाच वाचनाचे महत्व कळत असते त्यामुळे शासनही त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वाचनाची  परंपरा समृद्ध आहे : भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी

भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी  म्हणाले, पुस्तक वाचनातून समाज वाचन, स्वभाव वाचन, संस्कृती वाचन, लिपी वाचन करायला शिकता आले पाहिजे. वाचन संस्कृतीचा प्रवास भीमबेटकातील चित्रांपासून, शिलालेखांपासून तंजावुर मधील हस्तलिखित, दोलामुद्रितांपर्यंत असा आहे. वाचनाची ही परंपरा समृद्ध आहे. आपली वाटचाल पेपरलेस ग्रंथालयांकडे जरी होत असली तरी वाचन संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही.शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. साहित्याची आवड वाचनातूनच निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये प्रयत्न केल जात आहेत असेही ते म्हणाले.

वाचनानेच मी घडले : जिल्हाधिकारी निधी चौधरी

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी. निधी चौधरी म्हणाल्या, वाचनानेच मी घडले सध्या मी इ-फॉर्म किंवा डिजीटल स्वरूपामध्ये वाचन करते. वर्षभरात ३६५ पुस्तकं वाचायची असा संकल्प करून गेल्या वर्षभरात मी  ४१० पुस्तकं वाचली. सुप्रसिद्ध लेखक एस. एल. भैरप्पा यांचे उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले ‘पर्व’ हे पुस्तक मी ३ ते ४ वेळा वाचले आहे. टॉलस्टॉय, भैरप्पा वाचल्यावर दिवसभरात आलेला मानसिक थकवा जातो. आयुष्यात महाभारत मला खूप प्रेरक ठरले,असेही त्या म्हटल्या.

जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवाचन कट्टयात सहभाग घेतला. एकूण २८ सहभागींना भाषा संचालनालयाकडून प्रमाणपत्र व पुस्तक भेट देण्यात आले भाषा संचालनालयाचे प्रकाशन असलेली भारताचे संविधानाची द्विभाषी प्रत देऊन मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले


Tags: Government of MaharashtraMarathi LanguageMarathi Language Minister Deepak KesarkarmuktpeethVarious Activitiesघडलं-बिघडलंमराठी भाषामराठी भाषा मंत्री दीपक केसरकरमहाराष्ट्र शासनमुक्तपीठविविध उपक्रम
Previous Post

वाचनाच्या माध्यमातून माणूस संस्कारक्षम बनविण्याचे काम

Next Post

घरात बसूनही मतदान शक्य! काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?

Next Post
EC Door Step Voting Facility

घरात बसूनही मतदान शक्य! काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!