Wednesday, June 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई विद्यापीठाची पदवी वडिलांना समर्पित : उस्ताद झाकीर हुसेन

May 13, 2022
in घडलं-बिघडलं
0
Ustad Zakir Hussain

मुक्तपीठ टीम

जागतिक कीर्तीचे तबला कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी समारंभपूर्वक प्रदान केली. जगातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे, असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

जागतिक कीर्तीचे तबला कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांना मुंबई विद्यापीठातर्फे दिलेल्या पदवीचा स्वीकार करणे हा विद्यापीठाचा मोठा सन्मान असून या पुरस्कारामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

संगीत क्षेत्रात व इतर विद्याशाखांमध्ये आपला शिष्य आपल्याही पुढे जावा असे गुरुजनांना वाटते, दुःखद प्रसंगी संगीत मनाला सांत्वन देते ही संगीताची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीत देखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील असे राज्यपालांनी सांगितले. पंतप्रधान मोदी ‘मेक इन इंडिया‘चे आवाहन करीत आहेत. मात्र गरवारे समूहाने 80 वर्षांपूर्वीच ‘मेक इन इंडिया‘ ची सुरुवात केली होती असे राज्यपालांनी सांगितले. 

लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद : उदय सामंत

 ज्या झाकीर हुसेन यांचा तबला ऐकून आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसावयास मिळणे हा आपला बहुमान असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय सुरु होईल, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. या महाविद्यालयासाठी शासनाने १०० कोटी रुपयांची तरतूद देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम ठरविण्यासाठी झाकीर हुसेन, शंकर महादेवन, उषा मंगेशकर यांनी मदत करावी असे त्यांनी सांगितले. राज्यातील शैक्षणिक क्षेत्र प्रगती पथावर नेण्यासाठी आपण राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाची पदवी हा कृपाप्रसाद : उस्ताद झाकीर हुसेन

जगातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे, असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितले.

जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन रहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत असे सांगून आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक असल्याचे विनम्र उद्गार झाकीर हुसेन यांनी यावेळी काढले.  

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या विशेष दीक्षांत सोहळ्यात उद्योगपती शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी देण्यात आली तर रसायन शास्त्रातील योगदाबाबद्दल वैज्ञानिक डॉ मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला.

कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन कार्य केल्यास तो व्यक्ती घडतो आणि दुसऱ्याही घडवतो. भारतीय संगीत आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे संगीत क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अंगभूत गुणांमुळे स्वयंभू राजे बनले. विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे तसेच विविध कलाकार व विद्यापीठाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.


Tags: Doctor of LawMumbai University DegreeUstad Zakir Hussainउस्ताद झाकीर हुसेनडॉक्टर ऑफ लॉमुक्तपीठमुंबई विद्यापीठ पदवी
Previous Post

मुंबईच्या विकासासाठी आता एकच यंत्रणा, महापौर नेतृत्व करणार!

Next Post

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Next Post
Hasan Mushrif

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १० हजार १२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!