मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राहिलेले अनूप चंद्र पांडे यांची देशाच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनूप चंद्र हे १९८४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. फेब्रुवारी २०१९मध्ये ते निवृत्त झाले होते, परंतु योगी सरकारने त्यांचा कार्यकाल सहा महिन्यांनी वाढवला होता. आता निवडणूक आयुक्तपदी त्यांचा कार्यकाळ हा २०२४ पर्यंत असेल. बहुधा लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ठरवण्यात भाग घेतल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपेल.
निवडणूक आयोगातील रिक्त जागी नियुक्ती
• माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांचा कार्यकाळ १२ एप्रिलला पूर्ण झाला.
• तेव्हापासून निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होती.
• अनूप चंद्र पांडे यांची त्या पदावर नियुक्ती झाली आहे.
• अरोरा यांच्यानंतर सुशील चंद्र यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार आहे.
मुख्य सचिव पदावरील कामगिरीमुळे योगींचे विश्वासू
• मुख्य सचिव असताना अनूप चंद्र पांडे यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामांमध्ये हातभार लावला होता.
• फेब्रुवारी २०१८ मध्ये लखनऊ येथे झालेल्या इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात अनुपचंद्र पांडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
• यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर अनेक योजनांना पूर्ण करण्यामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
• योगी सरकारने त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचा कार्यकाळ ६ महिन्यांनी वाढविला होता.
कोण आहेत अनूप चंद्र पांडे?
• अनूप चंद्र पांडे यांचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी चंदीगड येथे झाला आहे.
• पांडे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगबरोबर मटेरियल मॅनेजमेंटमध्ये एमबीएही केले आहे.
• २०१८ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव असलेले अनूप चंद्र २०१९ च्या ऑगस्टपर्यंत आपल्या पदावर होते.
• ते यादरम्यान एनजीटीमध्ये देखरेख समितीचे सदस्य होते.
• त्यांनी ३७ वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केलंय.
• पांडे यांचा निवडणूक आयुक्त म्हणून ३ वर्षांचा कार्यकाळ असणार आहे.
• ते फेब्रुवारी २०२४ मध्ये निवृत्त होतील.