Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात येत्या सोमवारपासून अनलॉक कुठे, कधी, कसं?

June 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
unlock

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोना रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून अटी व शर्तींच्या अधीन राहून ही अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 

विभिन्न टप्प्यात निर्बंध उठवताना जिल्ह्यातील कोरोना प्रसाराचे दर, तेथे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार सुविधा, वैद्यकीय संसाधनाची उपलब्धता या आधारे सदर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थ चक्राला पुन्हा गती मिळणार असून त्यासोबतच कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठीही नाइलाजस्तव अनेक ठिकाणी निर्बंध लागू असतील.

 

१ प्रशासकीय घटक

अ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल.

ब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळा प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचा समावेश नसेल)

क) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.

 

२ निर्बंधांचे स्तर

राज्यभरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर बनविण्यात आले आहेत. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात या स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.

 

स्तर १- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.

स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी २५ ते ४० च्या दरम्यान असेल.

स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.

स्तर ५- जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असेल आणि ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.

 

साधारण मार्गदर्शक तत्त्वे

  • पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात किंवा लग्नसमारंभातील गर्दी.
  • स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी सोमवार ते शुक्रवार पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर/आवागमन.
  • स्तर ४ साठी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी पाच वाजल्यानंतर तसेच शनिवार व रविवारी आवश्यक आणि आपत्कालीन कारणा व्यतिरीक्त ये-जा करण्यास निर्बंध.
  • पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी.

 

विविध आर्थिक /सामाजिक कार्यक्रमांसाठी  विभिन्न स्तरांवर लागू असणारे निर्बंध खालीलप्रमाणे असतील:-

अनु क्र स्तर/ कार्य स्तर १ स्तर २ स्तर ३ स्तर ४ स्तर ५
१ आवश्यक वस्तूंच्या दुकान/ आस्थापना यांच्या साठी वेळ

 

नियमित नियमित रोज ४:०० वाजेपर्यंत रोज ४:०० वाजेपर्यंत आठवडाभर ४:०० वाजे पर्यंत व आठवड्याच्या शेवटी बंद. फक्त वैदकीय सेवा चालू
२ आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकान/ अस्थापना यांच्यासाठी वेळ नियमित नियमित आठवडाभर ४:०० वाजेपर्यंत बंद बंद
३ मॉल/ चित्रपटगृह (एकल स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स) /नाट्यगृह नियमित क्षमतेच्या ५० टक्के बंद बंद बंद
४ उपहारगृह नियमित क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेच्या ५० टक्के/ आठवडयाच्या दिवसी. जेवणासाठी ४:०० वाजे पर्यंत. त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी केवळ पार्सल/ होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी / अभ्यागतांना परवानगी नाही
५ लोकल ट्रेन नियमित / मापदंडांवर आधारित परंतु स्थानिक डी. एम. ए. स्तराच्या आधारे निर्बंध लागू करू शकतात वैद्यकीय व आवश्यक सेवांसाठी चालू. स्थानिक डी एम ए महिलांसाठी ही चालू ठेवू शकतात. निर्बंध लागू करू शकतात वैदकीय, आवश्यक, महिला,यांच्यासाठी चालू. डी. एम. ए. अतिरिक्त निर्बंध लागू करू शकतात केवळ वैद्यकीय व काही आवश्यक गोष्टींसाठी फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठी
६ सार्वजनिक ठिकाण, मैदान, वॉकिंग, सायकलिंग नियमित नियमित रोज सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत आठवड्याच्या दिवशी सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत. शनिवार रविवार बंद बंद
७  खाजगी कार्यालय उघडण्याबाबत सर्व सर्व सर्व .केवळ आठवड्याच्या दिवशी संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. अपवादात्मक श्रेणी वगळून अपवादात्मक श्रेणी बंद
८ कार्यालयात उपस्थिती शासकीय कार्यालय सहित (खासगी- जर मुभा असेल) १०० टक्के १०० टक्के ५० टक्के २५ टक्के १५ टक्के
९ क्रीडा नियमित इनडोर साठी सकाळी व संध्याकाळी ५:०० ते ९:००. ऑउट डोर पूर्ण दिवस ऑउटडोर सकाळी ५:०० ते ९:०० संध्याकाळी ६:०० ते ९:००. रोज सकाळी ५:०० ते ९:००. शनिवारी रविवारी बंद बंद
१० नेमबाजी नियमित नियमित (बबल) संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही बबल. गर्दी टाळावी/ रोज संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही तर शनिवारी, रविवारी हालचाली/ आवागमन करण्यास मनाई बंद
११ लोकांची उपस्थिती  (सामाजिक/सांस्कृतिक/ मनोरंजन) नियमित क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेच्या ५० टक्के फक्त आठवड्याच्या दिवशी. शनिवारी, रविवारी मनाई बंद बंद
१२ लग्न समारंभ नियमित दालनाच्या ५० टक्के क्षमेते पेक्षा जास्त नाही. कमाल १०० लोक. ५० लोक २५ लोक केवळ कुटुंब
१३ अंत्यसंस्कार नियमित नियमित २० जन २० जन २० जन
१४ बैठका/ निवडणुका/ स्थानिक प्रशासन स्थायी समिती बैठक. सहकारी मंडळ. नियमित क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेच्या ५० टक्के फक्त ओंनलाईन
१५ बांधकाम नियमित नियमित फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ किंवा मजुरांना ४:०० वाजेपर्यंत मुभा फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ फक्त आवश्यक बांधकाम
१६ कृषी नियमित नियमित दररोज  ४:०० वाजेपर्यंत आठवड्याच्या दिवशी ४:०० वाजेपर्यंत आठवड्याच्या दिवशी ४:०० वाजेपर्यंत
१७ ई कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित नियमित नियमित केवळ आवश्यक केवळ आवश्यक
१८ जमाव बंदी/ संचारबंदी नाही जमावबंदी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत जमाव बंदी. ५:०० नंतर संचारबंदी संचार बंदी संचार बंदी
१९ जिम, सलून,सौंदर्य केंद्र, स्पा/ वेलनेस केंद्र नियमित आगाऊ परवानगी/ क्षमतेच्या ५० टक्के संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही. संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही.केवळ लास घेतलेले उपभोगता. बंद
२० सार्वजनिक वाहतूक नियमित १०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. १०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. ५० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. ५० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही
२१ माल वाहतूक, कमाल तीन व्यक्ती/ चालक/ क्लीनर/सहायक व इतर.)यात्रीसाठीच्या सर्व अटी लागु असतील. नियमित नियमित नियमित नियमित ई पास सह
२२ अंतर जिल्हा प्रवास/खाजगी कार/टेक्सी/बस/ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या नियमित- जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. नियमित- जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. नियमित -जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. नियमित जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे. ये जा करण्यासाठी ई पास आवश्यक. केवळ वैदकीय आपत्काल किंवा आवश्यक सेवे साठी.
२३ उत्पादन. निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यांना माल निर्यात करायचा आहे. नियमित नियमित नियमित ५० टक्के कर्मचाऱ्यांसह. वाहतूक बबल मध्ये ये-जा करावी ५० टक्के कार्माच्यांसह. विलगीकरण बबल मध्ये
२४ उत्पादन

१-आवश्यक उत्पादन कंपन्या (आवश्यक माल/कच्चा माल/ आवश्यक मालासाठी पॅकेजिंग उत्पादन)

२-निरंतन उप्तादन करणाऱ्या कंपन्या.(ज्या उत्पादनगृहात उत्पादन लगेच थांबवणे शक्य नाही.

३-राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण साठी आवश्यक उत्पादने.

४-डाटा केंद्र/क्लाउड सेवा प्रदाते/आय. टी. सेवा

नियमित नियमित नियमित ५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा. कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा.
25 उत्पादन : अश्या सर्व उत्पादन केंद्र की ज्यांचा आवश्यक, निरंतर किंवा निर्यात उत्पादनात समावेश नाही. नियमित नियमित 50 टक्के कर्मचाऱ्यांसह/ वाहतूक बबलमध्ये   ये-जा. 50 टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबलमध्ये ये-जा. 50 टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक विल्गीकाराना मध्ये ये-जा.

 

सूचना

१- स्तर तीन, चार आणि पाच साठी जिथे आस्थापना संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा प्रदाते तसेच ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील.

२- ज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेन ने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल. आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.

३- एखाद्या प्रवाशाला पासची आवश्यकता असेल त्या ठिकाणी एका वाहनामध्ये असलेल्या सर्वांसाठी वेगवेगळे पास असणे अभिप्रेत आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेगळे पास लागणार नाहीत.

४- सरकारी कार्यालय आणि आपत्कालीन सर्व सेवा तसेच कोरोना व्यवस्थापनासाठी १०० टक्के हजेरीसह काम केले जाऊ शकते. मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांमधील हजेरी ही वर दिलेल्या पेक्षा जास्त असू शकते परंतु त्यासाठी मुख्य सचिव यांची परवानगी लागेल तर राज्यातल्या इतर भागात त्या त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.

५- आवश्यक सेवेमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील 

  • रुग्णालय, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.
  • पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पाळीव प्राण्यांसाठी खाद्य दुकाने.
  • वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम
  • वायु वाहन सेवा- यात विमान, विमानतळ, त्यांची देखरेख, विमान मालवाहतूक, इंधन व सुरक्षा यांचा समावेश होईल.
  • किराणा दुकाने, भाजी दुकान, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.
  • कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा.
  • सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस.
  • विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयातील कार्य.
  • स्थानिक प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व काम
  • स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा
  • रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा
  • सेबीशी संबंधित सर्व कार्यालय
  • दूरध्वनी सेवे साठी लागणारी सेवा
  • मालवाहतूक
  • पाणी पुरवठा सेवा
  • कृषीशी संबंधित सर्व काम ज्यात बी बियाणे खत कृषी साहित्य आणि उपकरणांचा समावेश असेल.
  • सर्व वस्तूंचे आयात-निर्यात
  • ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान
  • अधिस्वीकृती धारक पत्रकार
  • पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक
  • सर्व मालवाहतूक सेवा
  • डाटा केंद्र, क्लाऊड सेवा, माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवा
  • शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
  • वीज आणि गॅस पुरवठा सेवा
  • एटीएम
  • डाक सेवा
  • बंदरे आणि त्याच्याशी संबंधित कार्य
  • कस्टम हाऊस एजंट, बहुआयामी वाहतूक प्रदाता, जीवनावश्यक औषधी आणि इतर औषध उत्पादनाशी संबंधित आहेत
  • कच्चामाल पॅकेजिंगसाठी बाल तयार करणारे कंपन्या
  • मान्सून आणि पावसाळ्याशी निगडीत उत्पादन करणारी कंपनी
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे आवश्यक घोषित केलेल्या सेवा

Tags: CMO MaharashtraMaharashtrastate govtunlockअनलॉकमहाराष्ट्र
Previous Post

कंपन्यांच्या कॉर्पोरेट करापेक्षा सामान्यांचा आयकर जास्त!

Next Post

पर्यावरण रक्षणातील वाटा म्हणून प्रत्येकाने शंभर झाडे लावण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे आवाहन

Next Post
Ramdas Athavale

पर्यावरण रक्षणातील वाटा म्हणून प्रत्येकाने शंभर झाडे लावण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!