उज्वल खेळकर
पंकजा मुथा (नावं बदललेले) कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले आणि मुथा परिवार चिंतित झाला. पंकजा ही मुथांची मोठी सून. तिच्या मिस्टरांनी सांगितल्या प्रमाणे गेल्या आठवड्यात ती एस.बी.आयच्या औंध शाखेत (परिहार चौक) गेली होती. बँकेत गर्दी होती. बँक व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले होते. प्रत्येक काऊंटर समोर लांबच लांब रांगा. बँके बाहेर सुध्दा खूप गर्दी. ईअर अण्ड मुळे असावी एवढी गर्दी. पंकजाला बँकेत अर्धा तास लागाला. दुसर्या दिवशी रविवारी पंकजाला ताप आला. फॅमिली डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केलेत पण दुसर्या दिवशी ताप कमी होईना. मुथा परिवार घाबरणे स्वाभाविक होते. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे पंकजाची टेस्ट केली गेली. जी भीती होती तेच झाले. पंकजा पॉझिटीव्ह होती. कशी काय ? घरच्यांपुढे अनेक प्रश्न होते. पहिला म्हणजे, पंकजाला इन्फेक्शन कुठे झाले असेल? दररोज भाजी आणणे, गरजेनुसार किराणा भरणे बाकी घरची कामं करतांना सोशल डिसटंसींग पाळणे, मास्क न विसरता लावणे, गर्दी टाळणे….हो घरचे सगळेच या बाबी सांभाळत होते. मग नेमकं कोणाच्या संपर्कात पंकजा आली असावी असा विचार करत असताना दोन गर्दीची ठिकाण जिथे पंकजा गेली होती असे आठवले. ती म्हणजे, औधचे डी-मार्ट आणि एसबीआय बँक. हो, बँकेत खूप गर्दी होती आणि त्याठिकाणी अर्धा तास गर्दित थांबावे लागले होते पंकजाला. बहुतेक तोच अर्धातास घातक ठरला.
एसबीआय प्रमाणे औंध मध्ये अनेक राष्ट्रीय बँकांचे हाल आहेत. मी एक महिन्यापुर्वी डीपी रोड, औंधच्या महाराष्ट्र बँकेत जाणे टाळले होते. कारणं तोबा गर्दी. महिन्याच्या सुरवातीला पैंशनर्सची हमखास गर्दी या बँकांपुढे असते. मात्र नियोजनाचा बरा फरक खाजगी बँकांकडे होता. एचडीएफसी बँकेचे नियोजन चांगले होते. बँके बाहेर ठराविक अंतर राखूनच ग्राहकांना उभं राहायचे होते. त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सिक्युरिटी व बँकेचे तरूण एक्झिक्युटीव होते. एसडीएफसीत मला अनेक वेळा जावं लागलं. थोडा त्रास झाला थांबण्याचा पण सुरक्षित वाटले.
मॉल असो की बँक या सार्वजनिक ठिकाणांवर ग्राहकांची गर्दी होणारच. पण गर्दीचे नियोजन आणि सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन केले तर कोरोनाचा संसर्ग मोठ्युप्रमाणात टाळता येऊ शकतो.
आज कोरोनाच्या संसर्गाबाबत पुणे महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे. त्याचे मुख्य कारण सरकारी असो का खाजगी, सर्व सार्वजनिक ठिकाणांवरचे नियोजन. बँकांतर कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट झाले आहेत असेच पंकजाच्या केस वरून वाटू लागले आहे. त्यातही एसबीआय, महाराष्ट्र बँक सारख्या बँकांच्या व्यवस्थापकांना याबाबत सेफ्टी नॉर्म्सकडे अधिक लक्ष द्यावेच लागणार आहे. याचा अर्थ लोकांना सेवा न देणे असा नसून या बँकांनी आपल्या ऑनलाईन सेवांची गुणवत्ता अधिक वाढवणे व बँकेतल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे असा आहे.
पंकजा मुथाच्या परिवाराला भाग्याने वेळेवर एका रूग्णालयात बेड मिळाला. अर्थातच त्यासाठी (रू.५0,000/-) पंन्नास हजार ऍडव्हांस व (रू.२0,000) वीस हजार वेगळे औषधांसाठी मोजावे लागले. सर्वसाधारण जनतेला एंवढी रक्कम ठेवता याईलच असे नाहीये.
(उज्ज्वल खेळकर हे गेल्या तीन दशकांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची दूरदर्शनपासून एबीपी माझापर्यंतची फिल्ड ते न्यूजरुम कारकीर्द आहे. सध्या ते स्वतंत्र पत्रकारितेत कार्यरत आहेत.)