मुक्तपीठ टीम
२८० शब्दांमध्ये अभिव्यक्तीची शक्ती देणाऱ्या ट्विटरला भारतात मोठा धक्का बसला आहे. ट्विटरने भारताच्या आयटी नियमांचे पालन करण्यास उशीर केल्याने कंपनीची इंटरमीडिएट प्लॅटफॉर्मचा दर्जा संपुष्टात आणला आहे. याचा अर्थ असा की आता ट्विटरवर केलेल्या प्रत्येक ट्विटची जबाबदारी पब्लिशर म्हणून ट्विटरची असेल. सरकारच्या या कडक पावलाची बातमी आली असतानाच ट्विटरने मंगळवारी नव्या नियमांमुसार आवश्यक अधिकाऱ्याची नेमणूक करतानाच सरकारला सर्व काही अधिकृतरीत्या कळवणार असल्याचे जाहीर केले.
ट्विटरवर आता प्रत्येक ट्विटची थेट जबाबदारी
- माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ट्विटरवर आता थेट जबाबदारी असेल.
- आतापर्यंत ट्विटरला विभिन्न वापरकर्त्यांकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या कन्टेंटचा एक होस्टिंग प्लॅटफॉर्म मानला जात असे.
- आता ट्विटर आता त्याच्या व्यासपीठावर प्रकाशित केलेल्या पोस्टसाठी थेट जबाबदार असेल.
- याचा अर्थ असा आहे की जर ट्विटरवर कथित बेकायदेशीर सामग्रीचा आरोप असेल तर मध्यस्थ म्हणून नव्हे तर प्रकाशक म्हणून कारवाईस सामोरे जावे लागेल.
- ट्वीटसाठी ट्विटरवर फौजदारी कारवाई होऊ शकेल, जशी अन्य प्रकाशकांवर होते. याचा अर्थ आजवर मध्यस्त प्लॅटफॉर्म म्हणून असणारे संरक्षण उरलेले नाही.
दरम्यान ट्विटरने नरमाईची भूमिका घेत, मंगळवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार अंतरिम मुख्य तक्रार अधिकारी नियुक्त केल्याचे कळवले आहे. यासंबंधित तपशील ट्विटर लवकरच केंद्र सरकारला देणार आहे.
ट्विटरकडून भारतातील सर्व आयटी नियम पालन
- ट्विटर भारत सरकारच्या नव्या गाईडलाईन्सचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल
- ट्विटर यासंदर्भात कोणतीही पावले उचलत आहे, त्याची माहिती सतत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिली जाईल.
- गेल्या आठवड्यातच ट्विटरने नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेन्ट ग्रेव्हान्स अधिकारी यांना करारावर नियुक्त केले आहे.
- लवकरच या पदांवर कायमस्वरुपी नियुक्ती केली जाईल.
फेसबूकनेही मानले नवे आयटी नियम
- नव्या गाइडलाइन्सचे अनुसरण करून फेसबुकने देशात तक्रार अधिकारी नेमला आहे.
- एफबीने आपल्या वेबसाइटवर तंटा निवारण अधिकारी स्पूर्ती प्रिया यांचे नाव प्रकाशित केले आहे.
- एफबीने असे म्हटले आहे की यूजर ई-मेलद्वारे स्पूर्तीशी संपर्क साधू शकतात.
- या व्यतिरिक्त, वापरकर्ते फेसबुक इंडियामध्ये पोस्टद्वारे देखील त्यांच्या तक्रारी पाठवू शकतात.
फेसबुक व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपनेही आपल्या वेबसाईटवर ग्रेव्हान्स ऑफिसर म्हणून परेश बी लाल यांचे नाव प्रसिद्ध केले होते.