प्रसाद नायगावकर
जंगलात फिरताना वाघाचं दर्शन घडलं तर पर्यटकांचा जंगल सफारी सार्थक झाल्यासारखं वाटतं. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात तर पर्यटकांना एकाचवेळी दहा वाघांचं दर्शन घडतंय. यवतमाळ जिल्हा अलौकीक वनसंपदेने नटला आहे. याच साखळीत टिपेश्वर अभयारण्य देखील येते. टिपेश्वर अभयारण्यत हमखास पर्यटकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने येथे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
अनेकदा इतर व्याघ्र सफारींमध्ये वाघांच्या दर्शनासाठी पर्यटकांचे डोळे तरसतात. पण नुकतेच जंगल सफारी करताना सकाळच्या सुमारास पर्यटकांना मोठे व बच्चे मिळून दहा वाघ दिसले आहे. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. अशाच प्रकारे अन्यही पर्यटकांचा अनुभव आहे. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. या अभयारण्यात जवळपास २२ वाघ असल्याचे सांगितले जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून या अभयारण्यात व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटक यांची संख्या वाढली आहे. यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
मोहक नैसर्गिक सौंदर्य संपन्नतेनं नटलेलं टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात आहे. जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये पसरलेल्या या अभयारण्यात हिरवीगार वनराई आहे. उंच डोंगराळ व दऱ्या खोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात.
तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी वेगवेगळे जंगली प्राणी पक्षी यांचा नेहमी वावर असतो. वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर हे आणि अन्य प्राणी या अभयारण्यात आहेत. या अभयारण्यात मुक्त विहार करताना हरीण, नीलगाय दिसतात. पाणवठ्यावर आलेले माळढोक पक्षांचं दर्शन घडतं. काही ठिकाणी पाणवठ्यावर असलेला वाघ, काही ठिकाणी शिकारीच्या मुद्रेत पाहायला मिळतात.
पर्यटनासाठी उत्कृष्ट कालावधी – एप्रिल-मे
कसे पोहोचाल?:
- विमानाने- लगतचे विमानतळ सोनेगाव नागपूर (१७२ कि.मी.)
- रेल्वेने- जवळचे रेल्वे स्टेशन आदिलाबाद (३५ कि.मी. )
- रस्त्याने- पांढरकवडा ते अभयारण्य (अंतर ३५ कि.मी.) यवतमाळ-टिपेश्वर (६१ कि.मी.)
टिपेश्वर अभयारण्य नाव का?
जंगलातील टिपाईदेवी मंदिरावरुन यास टिपेश्वर नाव पडले. वाघ, बिबटया,चौशिंगा,काळवीट आदी प्राण्याचे येथे वास्तव्य आहे. वैविध्यपूर्ण वृक्ष व १६० प्रजातींचे पक्षीही येथे आहेत.
सौ. @Rrkondbattunwar आणि अन्य ट्विटरकर