मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात महागडा तुरूंग पुन्हा चर्चेत आहे. अमेरिकेत जेव्हाही सत्ताबदल होतो तेव्हा तेव्हा हा तुरुंग चर्चेत येतो. त्याचं नाव ग्वाटेमाला बे जेल. क्युबा या छोट्याशा देशात ग्वाटेमाला बे तुरुंग आहे. या तुरुंगात प्रत्येक कैद्यामागे होणारा खर्च हा साडे पाच कोटीं डॉलर्सचा आहे. जो जगताली शेकडो कोटींचे वार्षिक उत्पन्नही नसेल.
एकीकडे जगातील सर्वात महागडा तुरुंग, तर दुसरीकडे सर्वात वादग्रस्त असाही हाच तुरुंग आहे. कारण या तुरुंगात कैद्यांना लोखंडी साखळदंडाने बांधलेले असते. कारण अमेरिका तेथे त्याच कैद्यांना ठेवते जे जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी असतात. मानवाधिकार संघटनांना त्यांच्याशीही कडकपणे वागणे अमानुष वाटते. त्यामुळे अमेरिकन करदात्यांचा अगडबंब पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्चून बदनामीही का घ्यायची, या विचारातून सातत्यानं ग्वाटेमाला तुरुंग बंद करण्याची चर्चा होत असते.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुरुंगाचा औपचारिक आढावा घेतला. त्यानंतर बायडेन प्रशासनाने जगातील सर्वात महागडा जेल लवकरच बंद होणार असल्याचे संकेत दिले होते. अध्यक्ष बायडेन यांचे कार्यकाळ संपेपर्यंत हे बंद करण्याचे ध्येय आहे. ग्वाटेमाला बे तुरूंगाचे एक गुप्त युनिट (कॅम्प -७) यापूर्वीच बंद केले गेले आहे. येथे शिक्षा भोगणार्या कैद्यांना क्युबामधील अमेरिकेच्या अन्य तळावर असलेल्या तुरुंगात हलविण्यात आले आहे. कॅम्प -७ एक अतिशय गुप्त तुरुंग मानला जात असे.
ग्वाटेमाला तुरुंग का सतत चर्चेत?
- अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन बुश प्रशासनाने अफगाणिस्तान आणि इराकच्या व्यतिरिक्त ग्वांतानामो खाडीतील अनेक मोठ्या दहशतवाद्यांना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ग्वांटेमाला तुरुंगात ठेवण्यात आले.
- २००२ मध्ये क्युबामधील अमेरिकेच्या लष्करी तळाच्या तुरूंगात कैद्यांची छायाचित्रे प्रथमच उघड झाली.
- या तुरुंगातील सर्व कैद्यांना लोखंडी बड्या घातेल्या असतात.
- या कारागृहातील बहुतेक कैदी असे आहेत ज्यांना अमेरिकन सरकारने दहशतवादी नेते घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय आणि रेडक्रॉसने या कैद्यांशी माणुसकीने वागण्याची मागणी केली होती.
- या तुरुंगात एक कैद्यावर वर्षाला ५ कोटी ६० लाख खर्च केला जातो.
- अमेरीका सुरक्षा मुख्यालय पेंटागॉन जेलच्या देखभालीसाठी दरवर्षी ९ अब्ज रुपयांहून अधिक खर्च करते.
- कोरोना साथीच्या नंतर पुन्हा चर्चा झाली की बायडेन यांनी हा तुरूंग बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याने खूपच फायदा होईल.
जर अमेरिकेने हा तुरुंग बंद केला तर त्यामुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा डागही जाईल.