मुक्तपीठ टीम
अमेरिकेच्या नासाचे मिशन मार्स हे २०३ दिवसांचे अत्यंत आव्हानात्मक मिशन होते. या कालावधीत, ६ चाकांच्या रोबोटने सात महिन्यांत ४७ कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. नासाचा पर्सिव्हरेन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार होता तेव्हा श्वास रोखणारा क्षण आला होता. शेवटच्या सात मिनिटांत वेग शून्यावर आणायचा होता. मग सुरक्षित लँडिंग आवश्यक होते. तथापि, हे सर्व पूर्ण यशस्वीरित्या केले गेले. आणि आता त्याचे श्रेय भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक डॉक्टर स्वाती मोहन यांना देण्यात येत आहे.
स्वातीवर सर्वात मोठी जबाबदारी!
‘द सायन्स’ च्या मते, मंगळाजवळ जाणे काहीसे सोपे असू शकते, परंतु सर्वात कठीण होते तेथे रोव्हर उतरविणे. बहुतेक मिशन या स्टेजवर अयशस्वी ठरतात. शेवटच्या ७ मिनिटात १२ हजार मैलांच्या ताशी वेगाने पर्सिव्हरेन्स रोव्हरने शून्य गती गाठली. यानंतर लँडिंग केले. या उंचीवर वेग शून्यावर आणणे आणि नंतर हळू लँडिंग करणे हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. हे मिशन डॉ. स्वाती मोहन आणि तिच्या टीमने यशस्वी केले. जगाला आज त्यांचा अभिमान आहे.
‘टचडाउन कन्फर्म्ड’
स्वाती अभियंता आहे. पर्सिव्हरेन्स रोव्हरचे लँडिंग होताच त्याच्या कॉप्टरने पंख उघडले. स्वाती आणि नासाची टीमचा आनंद गगनात मावत नव्हता. जगाला एक लेसेज मिळाला- Touchdown confirmed.म्हणजेच लँडिंग यशस्वी झाले. हे शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक होते.
भारतीय नारी, सर्वात भारी!
• स्वाती फक्त एक वर्षाची असताना आई-वडिलांसोबत अमेरिकेत स्थलांतरित झाल्या.
• त्यांचे बालपण उत्तर व्हर्जिनियामध्ये गेले आहे.
• नवव्या वर्षी स्वातीने स्टार ट्रेक मालिका पाहिली होती.
• तिच्या मनात अंतराळात काही तरी करून दाखवण्याचं स्वप्न उमललं. तिने ठरवले की तेथे उंचावर…ताऱ्यांच्या अथांग विश्वात नवं काही तरी शोधायचं.
• तिने अभियांत्रिकी व अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले.
• कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये आणि त्यानंतर पीएचडी केली.
• नासामध्ये बऱ्याच वेळ कार्यरत आहे स्वाती
• स्वाती सुरुवातीपासूनच मिशन मार्स आणि विशेषत: पर्सिव्हरेन्स रोव्हरशी संबंधित आहे.
• तिने पासाडेना येथील नासाच्या जेट प्रोपल्शन युनिटमध्ये बराच सहभाग घेतला
• या कालावधीत अनेक अंतराळ मोहिमेवर आणि प्रगत तंत्रज्ञानावर संशोधन केले.
• शनी संबंधित मिशनमध्येही तिला महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ: