मुक्तपीठ टीम
सुकन्या समृद्धि योजना ही मुलींसाठी एक बचत योजना आहे. लहान बचत योजनांमध्ये सुकन्या ही सर्वोत्तम व्याज दर योजना आहे. सध्या एसएसवाय मध्ये ७.६% दराने व्याज दिले जाते. सुकन्या समृद्धी योजना खाते खूप कमी रकमेसह उघडता येते. ज्यांना लहान बचतीद्वारे मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करायचे आहेत अशा कुटुंबांना लक्षात घेऊन ही योजना तयार केली आहे.
आता पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये कोअर बँकिंग सिस्टम असल्यास सुकन्या समृध्दी योजना खात्यात इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर मोडद्वारेही व्यवहार होऊ शकतात.पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये कोअर बँकिंग सिस्टम असल्यास सुकन्या समृध्दी योजना खात्यात इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर मोडद्वारेही पैसे ट्रान्सफर करू शकता. पोस्ट पेमेंट बँक खात्यातून या खात्यावर पैसे ट्रान्सफर करू शकता. जर सुकन्या समृद्धि योजना खात्यात रक्कम चेक किंवा डिमांड ड्राफ्टने जमा केली गेली असेल तर खात्यात रक्कम क्लिअर झाल्यानंतर त्यावर व्याज दिले जाईल, तर ई-ट्रान्सफरच्या बाबतीत ही रक्कम जमा झाल्यापासून मोजली जाईल.
कसे कराल ई व्यवहार?
• यासाठी तुम्हाला तुमचे बचत खाते आयपीपीबी खात्याशी जोडावे लागेल.
• तुम्हाला डीओपी प्रॉडक्टवर जावे लागेल.
• येथे सुकन्या समृद्धि योजना खाते निवडावे लागेल. आता आपल्याला एसएसवाय खाते क्रमांक आणि डीओपी ग्राहक आयडी सिलेक्ट करावा लागेल.
• आता तुमच्या हप्त्याचा कालावधी व रक्कम निवडा.
• पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला आयपीपीबी नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळेल.
सुकन्या समृध्दी योजने अंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर १० वर्षाच्या कमी वयात किमान २५० रुपयांच्या ठेवीसह खाते उघडले जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृध्दी योजने अंतर्गत जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सुकन्या समृध्दी योजने अंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेत अधिकृत उघडता येते. सुकन्या समृद्धि योजना खाते उघडल्यानंतर, मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत किंवा १८ वर्षानंतर तिचे लग्न होईपर्यंत चालवले जाऊ शकते. सुकन्या समृध्दी योजना १८ वर्ष वयानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठीच्या खर्चाच्या अनुषंगाने ५० टक्के रक्कम काढता येते.
सुकन्या समृद्धि योजना उघडण्याच्या वेळी, मुलीचा जन्मदाखला पोस्ट ऑफिस किंवा बँकेला देणे आवश्यक आहे. यासह, मुलीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा देखील आवश्यक आहे. सुकन्या समृद्धि योजना खाते उघडण्यासाठी २५० रुपये पुरेसे आहेत. एकाच आर्थिक वर्षात एसएसवाय खात्यात किंवा एकदाच दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही.
पाहा व्हिडीओ :